ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

पोस्ट ऑफिसच्या 3 विशेष योजना; बचतीचा विचार आहे? तर या योजनेतून मिळतील दुप्पट पैसे..

3 special post office plans; Thinking of saving? So you will get double the money from this scheme.

पोस्ट ऑफिसच्या या 3 विशेष सेव्हिंग स्कीम (Saving Schemes) विषयी माहिती आहे का? या योजनेमधून चांगली बचत करू शकता. या योजनांमध्ये नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स (National Savings Certificates) पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट (Post office time deposit) आणि किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra) चा समावेश आहे. याविषयी सविस्तर माहिती घेऊया..

वाचा मोठी स्कीम; पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करा, मिळतील महिन्याला 5 हजार रुपये

1) किसान विकास पत्र –

किसान विकास पत्र (kisan vikas patra) पोस्ट ऑफिसमध्ये खरेदी करू शकता. याची सुरुवात 1000 रुपयांपासून होते. हे बाँडप्रमाणे प्रमाणपत्राच्या रूपात जारी केले जाते. यावर सरकारकडून (government) ठरलेले व्याज मिळते. सरकार (government) दर महिन्यासाठी व्याज दर ठरवते. 6.9 टक्केच्या व्याजदाराने या स्कीम अंतर्गत 9 वर्ष आणि 2 महिने म्हणजे 110 महिन्यात पैसे डबल होतात.

वाचा मोठी बातमी, घरकुलच्या प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांना दिलासा; 900 कोटि रुपयांचा निधी वितरित..

2) पोस्ट राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र –

राष्ट्रीय बचत पत्र किंवा NSC मध्ये दरवर्षी 6.8 टक्केच्या दराने व्याज मिळते. हे व्याज वर्षाला मॅच्युअर मिळते, मॅच्युरिटीवर देय असते. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रात जमा पैसे प्राप्तीकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत कपातीसाठी पात्र आहे.

3) पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट –

या योजनेत एका ठराविक कालावधीसाठी एकरकमी पैसे जमा करू शकता. गॅरंटी रिटर्न आणि व्याज पेमेंटची (Guaranteed return and interest payment) पसंतीची सुविधा मिळते. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्षाच्या मॅच्युरिटी कालवधीच्या जमा रक्कमेवर 5.5 टक्केच्या दराने व्याज मिळते. पाच वर्षाच्या खात्यावर 6.7 टक्के रिटर्न मिळते.

वाचा आता 18 वर्षा खालील मुलांना पण काढता येणार पॅन कार्ड; त्वरित असा करा अर्ज..

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button