ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Crop Insurance | मोठी बातमी! नुकसानग्रस्त ‘या’ जिल्ह्यातील सोयाबीन पिक विम्यासाठी 14 महसूल मंडळे पात्र, जाणून घ्या सविस्तर

Crop Insurance | नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पीक नुकसानीची भरपाई दिली जाते. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक (Financial) दिलासा मिळतो. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे 50 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असल्यास शेतकऱ्यांना (Crop Insurance Scheme) पीक विमा योजनेच्या तरतुदीनुसार शेतकऱ्यांना (Agriculture) 25 टक्के रक्कम आगाऊ स्वरूपात देण्यात येते. याचसाठी नांदेड, अकोला आणि लातूर जिल्ह्यातील अधिसूचना जारी करण्यात आल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊयात लातूरमधील कोणती महसूल मंडळे पात्र झाली आहेत.

वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! प्रोत्साहन अनुदानासाठी 50 टक्के निधी वितरित, जाणून घ्या कधी होणार खात्यात जमा

कोणती महसूल मंडळे पात्र?
22 जुलै 2022 रोजी लातूर जिल्ह्यासाठी संयुक्तिक समिती बनवण्यात आली होती. याच संयुक्तिक समितीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील सोयाबीन (Soybeans) पिकासाठी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पात्र करण्यात आले आहे. लातूर जिल्ह्यातील 50 टक्केपेक्षा जास्त उत्पादनात घट असलेली 14 महसूल मंडळे पात्र करण्यात आली आहेत. सोयाबीनसाठी पीक विमा मिळणार आहे.

वाचा: बाप रे! घोणस अळी पिकासाठीच नाहीतर शेतकऱ्यांसाठीही ठरतेय घातक, प्रादुर्भाव रोखण्यासाठी फवारा ‘हे’ औषध

लातूर जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळे

• औसा महसूल मंडळ 50.16% घट
• बहादा महसूल मंडळा 51.34%
• किल्लारी महसूल मंडळ 58.90%
• लाभजना मंडळ 51.95%
• किनी थॉट मंडळामध्ये 51.03%
• निलंगा महसूल मंडळ 50.55%
• मदनसुरी महसूल मंडळ 50.44%
• पानचिंचोली महसूल मंडळ 60.14%
• भूतमूंगळी महसूल मंडळ 51.0%
• पोहरे गाव महसूल मंडळा 61.35%
• रेनापुर महसूल मंडळ 62.60%
• पळशी महसूल मंडळ 61.33%
• ओलांडी महसूल मंडळ 50.70%
• बोरोड महसूल मंडळ 53.46%

लातूर जिल्ह्यातील 4 तालुक्यातील 14 महसूल मंडळ पात्र करण्यात आली आहेत.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Big news! 14 Revenue Boards Eligible for Soybean Crop Insurance in Damaged latur District, Know Details

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button