ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
आरोग्य

Health Tips | जास्वंदाचा चहा प्या अन् तरुण दिसा, जाणून घ्या आरोग्याबाबतचे 10 फायदे

Health Tips | तुम्हाला हिरव्या, काळ्या, लिंबू किंवा दुधाच्या चहाबद्दल माहिती असेलच. पण तुम्ही कधी हिबिस्कस चहाबद्दल ऐकले आहे का? तुम्ही ऐकले नसेल तर आम्ही सांगू. जास्वंद चहा (Hibiscus tea) एक हर्बल चहा आहे. उकळत्या पाण्यात हिबिस्कसची फुले घालून ते तयार केले जाते. ग्रीन टी (Green tea) प्रमाणेच याचेही अनेक फायदे आहेत, हे जाणून तुम्हीही तुमच्या घरातील बागेत जास्वंदाचे रोप नक्कीच लावाल. जास्वंद चहाचा एक घोट केवळ थकवा दूर करत नाही तर तुमची त्वचा उजळते. चला तर मग जाणून घेऊया त्याचे फायदे.

वाचा: लम्पी व्हायरसमुळे देशातील 58 हजारांहून अधिक जनावरांचा मृत्यू, जाणून घ्या किती आहे खतरनाक

काय आहेत जास्वंदाच्या चहाचे फायदे
• जास्वंद चहामध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर, लोह आणि अँटिऑक्सिडंट असतात. त्यामुळे ते प्यायल्याने अनेक आजार टाळता येतात.
• हा चहा पोटाची चरबी कमी करतो. त्यात पुरेशा प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स असतात. हे अँटी-ऑक्सिडंट्स आपल्या शरीरातील चयापचय क्रियाशील बनवण्याचे काम करतात. हे रोज प्यायल्याने तुमचे पोट सपाट होऊ शकते.
• जर तुम्ही केस गळण्याच्या समस्येशी झुंज देत असाल तर हा चहा प्यायल्याने केस गळणे कमी होते तसेच केस देखील दाट होतात.

• हा चहा रोज प्यायल्याने तुम्ही कॅन्सरसारख्या गंभीर आजारांपासूनही दूर राहू शकता. हे कर्करोगाच्या पेशींची वाढ मंदावते.
• अँटिऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्स नावाच्या संयुगांशी लढण्यास मदत करतात, ज्यामुळे शरीराच्या पेशींना नुकसान होते.
• बीपीची समस्या खूप वेगाने पसरते. अशा परिस्थितीत जर तुम्ही रोज जास्वंद चहाचे सेवन केले तर तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहतो.

वाचा: पुढच्या 4 ते 5 दिवसांत विजांच्या कडकडाटासह होणार मुसळधार पाऊस, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

• जास्वंद चहा यकृताचे आरोग्य देखील चांगले ठेवते. याशिवाय हा चहा वजन कमी करण्यासाठीही काम करू शकतो.
• या चहामध्ये असे अनेक घटक असतात, ज्यामुळे मन शांत राहते आणि नैराश्य दूर होते.
• अँटिऑक्सिडंट आणि कॅन्सरविरोधी गुणधर्म असण्याव्यतिरिक्त, काही अभ्यासांनी दर्शविले आहे की जास्वंद चहा बॅक्टेरियाच्या संसर्गाशी लढण्यास मदत करू शकते. उदाहरणार्थ, ब्राँकायटिस, न्यूमोनिया ते मूत्रमार्गाच्या संसर्गामध्ये ते फायदेशीर ठरू शकते.
• जर तुमच्या तोंडात फोड आले असतील तर तुम्ही हिबिस्कस चहा पिऊन त्यापासून सुटका मिळवू शकता. याशिवाय त्याची पाने चघळली तरी फायदा होतो.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Drink hibiscus tea and look young, know 10 health benefits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button