ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
इतर

‘या’ शेतकऱ्याच्या हौसेला नाही मोल; मुलीच्या लग्नात जावयाला आणण्यासाठी पाठवले चक्क हेलिकॉप्टर !

नाशिक : मुलीच्या लग्नासाठी प्रत्येक बापाने काही ना काही स्वप्न पाहिलेली असतात.आपल्या मुलीचे लग्न (Daughter’s Wedding) अविस्मरणीय (Memorable) व्हावे यासाठी ते हरतऱ्हेने प्रयत्न करतात. नाशिक जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने देखील मुलीच्या लग्नात हौस करत जावयाला आणायला चक्क हेलिकॉप्टर पाठवले.

वाचा –

जावयाचा लाड करणारे हे सासरे नक्की आहेत तरी कोण

मुलीच्या माहेरी कायम जावयाची मर्जी राखली जाते. त्याचा सन्मान केला जातो, पण मुलीच्या लग्नात नवरदेवाला हेलिकॉप्टर पाठवून अजब पद्धतीने जावयाचा लाड करणाऱ्या ढाकंबे येथील प्रगतशील शेतकरी गोपीनाथ बोडके यांनी सर्वाना आश्चर्यचकित केले आहे. नुकताच बोडके यांची उच्चशिक्षित कन्या वैष्णवी हीचा विवाह (Marriage) बहुला येथील उच्चशिक्षित मुलगा शांताराम नागरे याच्याशी झाला. यावेळी बोडके यांनी जावयाची अशी हौस केली.

वाचा –

म्हणून पाठवले हेलिकॉप्टर

नवरदेवासह मुलीच्या सासरच्या मंडळींना देखील आश्चर्यचकित करत जावयाला ऐनवेळी हेलिकॉप्टर ने यायला सांगितल्याने या लग्नाची चर्चा सर्वत्र झाली. यावर बोलताना बोकडे म्हणतात की “प्रत्येक मुलीच्या वडिलांची (Bride’s Father) इच्छा असते आपल्या मुलीचे लग्न थाटात व्हावे. माझीसुद्धा अशीच इच्छा होती. त्यामुळे लाडक्या कन्येचे लग्न काही तरी वेगळ्या स्वरूपात (Unique) करायचे ठरवले आणि करून दाखवले.” बोडके यांनी त्यांच्या या कृतीतून हौसेला मोल नसते हे दाखवून दिले आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button