ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी तंत्रज्ञान
ट्रेंडिंग

पीक काढणीनंतर ची सगळी कामे होतील या एकाच मशीन ने, जाणून घ्या यंत्राबद्दल ची संपूर्ण माहिती…

With this single machine all the work will be done after harvesting, learn the complete information about the machine.

शेतीच्या कामामध्ये आलेल्या नवीन तंत्रज्ञानामुळे कष्टाची कामे ही कमी होत चाललेले आहेत. खरोखरच मजुरांची कमतरता सध्याच्या शेतीलाही भीषण समस्या आहे. खरोखरच नवीन नवीन प्रयोग, नवीन तंत्रज्ञान ( new technology )हे शेतकऱ्यांसाठी एक वरदान मानले जात आहे. अलीकडे पीक काढण्यासाठी बरीच यंत्रे वापरली जातात. कम्बाईन हार्वेस्टर चा वापर वाढत चालला आहे, यामुळे पीक काढणीला वेग आणि वेळेची बचत होते.

पीक काढणीनंतर यंत्राद्वारे शिल्लक ला राहिलेला रो मटरेल हे शेतातच पडून राहते किंवा हे शेतकरी जाळून टाकतात त्यामुळे प्रदूषण होऊ शकते. जनावरांच्या खाद्यासाठी ही उपयुक्त ठरत नाही.

हे हार्वेस्टर ( harvester )चे दुष्परिणाम भरून काढण्यासाठी एक नवीन यंत्र तयार केले आहे ते म्हणजे स्ट्रॉ कम्बाईन यंत्र. या यंत्राद्वारे पीक काढणीनंतर शिल्लक ला राहिलेला पेंढा कापणी, त्याचे बारीक तुकडे करणे, गोळा करणे या गतीने कामे एकत्रित हे यंत्र करते.
स्ट्रो कंबाईन (straw combine machine) यंत्र हे 35 एचपी ट्रॅक्टर ने चालू शकतो. अशा प्रकारची यंत्रे स्वयंचलित पद्धतीने सुद्धा मार्केट मध्ये उपलब्ध आहे ह्याच्या मागे एक ट्रॉली दिली आहे जेणेकरून सगळ्या माल त्याच्यामध्ये आपण गोळा करू शकतो.

हेही वाचा: आश्चर्य! जगातील सर्वात छोटी गाय भारतामध्ये लांबी दोन फूट काय वेगळेपण आहे या गाई मध्ये..

असे काम करते हे यंत्र.. या यंत्र पाच विभागांमध्ये विभागलेले आहे. कापणी घटक, पेंढा कापून गोळा करणे, आणि फीडिंग युनिट, पेंढयांचा भुगा करणारी युनिट, भुसा बाहेर टाकणारे युनिट. या यंत्रामध्ये प्रमुख घटक म्हणजे गिअर बॉक्स, रेसिपी ऑफ क्रिटिंग सिलेंडर, कटर बार, रेल, कनवेअर, चाळणी हे आहेत.

पीक कापणी नंतर गोळा झालेला पेंडा स्ट्रोक कम्बाईन फिडर ने गोळा केला जातो. नंतर सिलेंडर विभाग जाऊन ते कटरच्या सहाय्याने कटिंग केला जातो. कम्बाईन हार्वेस्टर नि सोडलेला पेंढा रिसिप्रोकेट कटरने कट केला जातो. नंतर तो ब्लॉवर दोरे वेगळा केला जातो आणि राहिलेला भुसा हा मागे ट्रॉलीमध्ये कन्वेयर च्या साह्याने गोळा केला जातो

हेही वाचा: देशी गाई मधील प्रजनन व्यवस्थापन करताना, घ्या “ही” काळजी..देशी गाई मधील प्रजनन व्यवस्थापन करताना, घ्या “ही” काळजी..

यंत्राचा तपशील (specification of machine )…

  1. एकूण परिमान – 468 x 160 x 197 इन सेन्टमीटर.

2. कॅटर बर रुंदी – 200 सेंटीमीटर

3. ब्लॉवर आकार – 70 x 50 सेंटीमीटर

हेही वाचा: ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी या झाडाचे पान ठरते फायदेशीर, पहा अजून काय गुणधर्म आहे या झाडांमध्ये..

स्ट्रॉ कंबाईन ची क्षमता( capacity of machine) या यंत्राची कार्यक्षमता ही अर्धा हेक्‍टर प्रति तास एवढी आहे. पारंपारिक पद्धतीच्या जवळ-जवळ 60 टक्के वेळेचा फायदा होतो. यामुळे धान्याचे नुकसान कमी होते.

हेही वाचा.. काय आहे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि या पासून कसा होईल शेती क्षेत्राला उपयोग; याबाबत सर्व काही जाणून घ्या.

शेतकऱ्यांच्या भेटीसाठी आले आहे हे नवीन ॲप काय वैशिष्ट्य आहे “ह्या” एप्लीकेशन मध्ये पहा सविस्तर बातमी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button