ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला
ट्रेंडिंग

Wheat Varieties | गहू लागवडीसाठी ‘या’ जातींची निवड करा आणि मिळवा भरघोस उत्पन्न..

Wheat Varieties | महाराष्ट्रामध्ये गव्हाचे पीक ( Wheat) बऱ्याच मोठया प्रमाणत घेतले जाते . महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या अन्नधान्य पिकांपैकी गहू हे रब्बी हंगामातील (Rabbi Season) एक महत्वाचे पिक आहे. गहू हा जिरायत व बागायत अशा दोन्ही प्रकारे घेतला जातो. गव्हाच्या अधिक उत्पादनासाठी वेळेवर पेरणी, योग्य वाणांचा वापर, योग्य प्रकारे खत, पाणी व्यवस्थापन व पीक संरक्षण या बाबींचा अवलंब करून गव्हाचे प्रती हेक्टरी उत्पादन व उत्पादकता वाढविणे गरजेचे आहे. यापैकी गहू लागवडीसाठी गव्हाच्या कोणत्या जातीची निवड करावी याविषयी कृषी संशोधन केंद्र, निफाड येथील तज्ज्ञांनी दिलेली माहिती पाहुया.

गव्हाच्या सुधारित जाती –

बागायत वेळेवर पेरणी

1) सरबती जाती ( Sharbati Wheat )- फुले समाधान, त्र्यंबक, तपोवन, एम.ए.सी.एस. ६२२२, एमएसीएस-६४७८.

  • बागायती उशिरा पेरणीसाठी फुले समाधान , एकेएडब्ल्यू- ४६२७ जातीची शिफारस.
  • पाण्याची उपलब्धता कमी प्रमाणात असल्यास एनआयएब्ल्यू – १४१५ (नेत्रावती) आणि एचडी २९८७ (पुसा बहर) जातींची निवड करावी.

2) बन्सी जाती ( Bansi Wheat) –

  • बागायती वेळेवर पेरणी एनआयडीडब्ल्यू – २९५ (गोदावरी) जातीची निवड करावी.
  • एमएसीएस-४०२८, एमएसीएस- ४०५८ जातींची निवड करावी.

वाचा:  शेतकऱ्यांनो लक्ष द्या! यंदा गहू लागवडीतून बंपर उत्पादन मिळवण्यासाठी ‘अशा’ पद्धतीने करा पेरणी

3) नवीन प्रसारित जाती –

१) फुले समाधान | Phule samadhan (एनआयएडब्ल्यू १९९४) –

  • ही जात बागायती क्षेत्रात वेळेवर (१ ते १५ नोव्हेंबर) तसेच उशिरा (१५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर) पेरणीसाठी योग्य आहे.
  • वेळेवर पेरणीसाठी उत्पादन ४६.१२ क्विंटल/हेक्टर मिळते.
  • उशिरा पेरणीमध्ये उत्पादन ४४.२३ क्विंटल / हेक्टर मिळते.
  • ही जात तांबेरा रोग तसेच मावा किडीस प्रतिकारक्षम आहे.
  • चपातीची प्रत उत्कृष्ट व प्रचलित जातीपेक्षा सरस.
  • प्रचलित जातीपेक्षा ९ ते १० दिवस लवकर तयार होते.

२) फुले सात्त्विक | Phule Satvik (एन.आय.ए.डब्ल्यू.३१७०)-

  • संरक्षित पाण्याखाली पेरणीसाठी प्रसारित.
  • प्रथिनांचे प्रमाण ११ ते १२ टक्के, बिस्कीट स्प्रेड मानक १०
  • दाण्याचा कडकपणा खूप कमी म्हणजे (३० ते ४५ टक्के) तसेच ब्रेड गुणवत्ता स्कोअर ७.० ते ७.५०, ग्लूटेन इंडेक्स ८० ते ८५ टक्के.
  • चपातीचा गुणवत्ता स्कोअर हा ७ ते ७.५. यामध्ये लोहाचे प्रमाण हे ३५ ते ४० पीपीएम, झिंक ३० ते ३५ पीपीएम. -तांबेरा रोगास प्रतिकारक्षम.
  • उत्पादनक्षमता ३५ ते ४० क्विंटल प्रति हेक्टरी

वाचा: Wheat | तब्बल 8 हजार रुपये क्विंटलने विकला जातोय ‘हा’ गहू, शेतकऱ्यांनो मालामाल होण्यासाठी हा गहू पिकवाचं…

३) एनआयडीडब्ल्यू | NIDW -११४

  • द्विपकल्पीय विभागातील जिरायती किंवा एका ओलिताखाली (एक पाणी पेरणीनंतर ४२ दिवसांनी) वेळेवर पेरणीसाठी बन्सी जात शिफारशीत आहे. .
  • तांबेरा रोगास प्रतिकारक असून शेवया, कुरड्या व पास्ता यासाठी उत्तम आहे.
  • तयार होण्याचा कालावधी ११० ते ११५ दिवस.
  • उत्पादनक्षमता ३५ ते ४० क्विंटल प्रति हेक्टरी.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button