ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Walking Mango| अजबच! ‘या’ गावातला आंबा चक्क चालतो, ते ही तब्बल तेराशे वर्षांपासून; पटत नाही, मग हा व्हिडिओ बघाच

Walking Mango| कसं शक्य आहे? आहे, शक्य आहे. म्हणजे आपल्याला वाटत असतं की हे अशक्य आहे. पण तसं नसतं. म्हणजे आपल्याला जे वाटेल ते तसेच असेल असं नसतं. सुरुवातीला पृथ्वी स्थिर आहे असं वाटायचं आपल्याला. पृथ्वी फिरते. कसं शक्य आहे? गॅलिलिओनं सांगितलं. शक्य झालं. आपल्याला कळलं. युरेका. म्हणजे पृथ्वी फिरते. तर सांगायचा मुद्दा हा की शक्य असण्याची शक्यता ही कायमच असते. आता हेच पहा की. गुजरातमध्ये एक गाव आहे. या गावात एक आंब्याचं झाड आहे. जे चालतं. कसं शक्य आहे?

आंबा चालतो…

झाडांची मुळं जमिनीत घट्ट रुजलेली असतात. त्यामुळं झाडं ही कसल्याही परिस्थितीत खंबीरपणे उभी असतात. वारा, वादळ, गारा कुठल्याही परिस्थितीत. जमिनीत मुळं घट्ट रुजलेली असल्यामुळं. माणसाला मुळं नसतात. म्हणजे असतात पण ती निराळी. चालता-चालता, जगता-जगता सोबत येणारी. झाडांसारखी नव्हेत. पाय असतात. त्यामुळं माणूस चालतो. झाडं चालू शकत नाहीत. त्यांना पाय नसतात. मुळं असतात. पण गुजरातमधल्या वलसाड जिल्ह्यातल्या उमरगाम तालुक्यातला हा आंबा चालतो. कसं शक्य आहे? आंबा कसा चालू शकतो? गॅलिलिओ?

काय सांगतात स्थानिक

वली अहमद अच्छू यांच्या मळ्यात हे झाड आहे. स्थानिक लोक या आंब्याला पवित्र मानतात. पूजाही केली जाते या आंब्याची. भारतीय परंपराच तशी आहे. आश्चर्यांची पूजा करण्याची. स्थानिक सांगतात, हे झाड 1300 वर्षांपूर्वीचं आहे. पारशी समाजानं लावलेलं. हे झाडं हळूहळू पूर्वेकडं सरकत आहे. गेल्या दोन शतकांमध्ये हे झाड 200 मीटर अंतरावर गेलेलं आहे. शक्य आहे. झाडही चालू शकतं गॅलिलिओ.

पर्यटकांसाठी आकर्षण

म्हणजे हे शक्य आहे तर. शक्य असण्याची शक्यता कायम खुली असते गॅलिलिओ. तर हे झाड सबंध देशभरातील पर्यटकांना आकर्षित करत आहे. जर आपण बोलवलं तर कदाचित झाड आपल्यापर्यंत येईलही. पण या झाडाची चालण्याची गती बघता याला अजून तेराशे वर्षं लागतील. आणि आपलं नशीब कुठं एवढं मेहेरबान. त्यामुळं त्या झाडाच्या भेटीला आपल्यालाच जायला हवं. गॅलिलिओ येशील का?

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button