ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
यशोगाथा

Success Story | ठरवलं तर दोन बहिणी कायपण करू शकतात ना राव! थेट 30 एकर शेती सांभाळत चालवतात ट्रॅक्टर; जाणून घ्या सविस्तर..

Success Story | आजकाल मुली सर्वच क्षेत्रात पुढे असून आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, सांस्कृतिक, संरक्षण यांसारख्या क्षेत्रात मुली मुलांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. इतकंच नाही तर कृषी क्षेत्रात देखील मुली पुढे आहेत. मुलींच्या कर्तृत्त्वासमोर आजकाल भले भले झुकताना पहायला मिळत आहेत. संगमनेर तालुक्यातील दोन बहिणींनी सुद्धा आपल्या कर्तृत्त्वाने अनेकांना आश्चर्यचकित करून सोडले आहे.

शेलकेवाडी या सामान्य शेतकरी कुटुंबातील या दोन्ही बहिणी आहेत. यांची नावे वंदना व ऋतुजा अशी आहेत. वंदना व ऋतुजाने घरच्या सर्व शेतीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. या दोघी बहिणी मिळून शेतात कष्ट करतात. भाऊ नसल्याने संपूर्ण शेतीचा ताण आईवडिलांवर येतो. म्हणून स्वतःहून पुढाकार घेत वंदना व ऋतुजा शिक्षण सांभाळत शेती करत आहेत.

20 एकर शेतीचा भार सांभाळतात दोघी

शेतात ट्रॅक्टर चालवून नांगरणी व वखरणी करणे, फळझाडांवर फवारणी करणे यांसारखी कामे वंदना व ऋतुजा शेतामध्ये करतात. त्यांच्या वयाच्या मुली फार फार तर शेतात खुरपणी करतात. मात्र या दोघी बहिणी न डगमगता व न थकता शेतातील मोठी मोठी कष्टाची कामे देखील सहज करतात. त्यांच्या घरी एकूण 30 एकर शेती असून 20 एकर बागायती आहे. यामध्ये डाळिंब, हरभरा, कांदे, यांसारखी पिके घेतली जातात.

असा असतो दिनक्रम

वंदना सध्या बीफार्मसी करत आहे तर ऋतुजा दहावीत आहे. सकाळी पहाटे लवकर उठून स्वतःचे आवरून गायींचे दूध काढणे, दूध काढल्यावर स्वतः ते दूध स्कूटीवरून डेअरीवर घालणे. घरी परतल्यावर गायींसाठी पेंड व गायींचे खाद्य घेऊन येणे. शेतातून चारा आणणे. गायींना खाऊ घालणे, शेतातील कामे करणे ही सर्व कामे वंदना करते. यातून मिळालेल्या वेळेत ती अभ्यास देखील करते.

युवापिढी समोर निर्माण केला आदर्श

शेतात व घरात काम करून देखील वंदना कॉलेजमध्ये अगदी अप टू डेट असते. त्यामुळे ही मुलगी एवढी कष्टाची कामे करत असेल असे कोणाला वाटणार देखील नाही. दरम्यान शिक्षण घेत आपल्या मुली शेताच्या व घराच्या कामात हातभार लावत आहेत. याचा वंदना व ऋतुजाचे वडील लिंबाजी शेळके यांना प्रचंड अभिमान वाटतो. आपल्या कामातून वंदना व ऋतुजा यांनी युवापिढीसमोर आदर्श ( Youth Idol) निर्माण केला आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Two sisters works in farm like son to help father

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button