ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

Vegetable Agricultural Advisory | राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज! नुकसानीपूर्वी जाणून घ्या भाजीपाला आणि फळ बागांसाठी कृषी सल्ला

Vegetable Agricultural Advisory | तननाशकाची खरेदी आणि फवारणी करताना लेबल नीट वाचून घ्यावे. ढगाळ हवामान व पाऊस
असताना तननाशकाची फवारणी करू नये. वारा नसताना व जमिनीत पुरेसा ओलावा असताना उगवण
पूर्व तन नाशकाची फवारणी करावी. फवारणीकरिता स्वच्च्छ पाणी वापरावे तसेच कडक उन्हात उगवण
पश्चात फवारणी टाळावी. तन नाशकाचा वापर काळजीपूर्वक करावा. भाजीपाल्याबाबत कृषी सल्ला (Vegetable Agricultural Advisory) जाणून घेऊयात.

वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानच्या 14 व्या हप्त्याची तारीख झाली जाहीर, जाणून घ्या कधी होणार खात्यात जमा?

संक्षिप्त कृषी सल्ला

मागील आठवड्यात झालेला पाऊस व पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता हंगामी पिके, फळबागा व भाजीपाला
पिकाच्या शेतात पाणी साचून राहणार नाही यासाठी सऱ्या फोडाव्या तसेच अतिरिक्त पाण्याचा निचरा कराव.

मिरची

मिरचीच्या 4 ते 6 आठवड्याच्या वयाच्या रोपांची लागवड वाफसा अवस्थेत करावी. मिरचीच्या
रोपांची लागवड करण्यापूर्वी रोपांचे शेंडे डायमेथोएट 30 ईसी 10 मि. ली + पाण्यात मिसळणारे गंधक (80%) 3 ग्रॅम + मॅन्कोझेब 75% डब्ल्यूपी 2.5 ग्रॅम एक लिटर पाण्याच्या द्रावणात बुडवून मागील आठवड्यात झालेला पाऊस व पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतात पाणी साचून
राहणार नाही यासाठी सऱ्या फोडाव्या तसेच अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. मिरचीच्या 4 ते 6
आठवड्याच्या वयाच्या रोपांची लागवड वाफसा अवस्थेत करावी. मिरचीच्या रोपांची लागवड
करण्यापूर्वी रोपांचे शेंडे डायमेथोएट 30 ईसी 10 मि. ली + पाण्यात मिसळणारे गंधक (80%) 3 ग्रॅम

  • मॅन्कोझेब 75% डब्ल्यूपी 2.5 ग्रॅम एक लिटर पाण्याच्या द्रावणात बुडवून लावावे.

संत्रा

झाडांच्या बुंध्याजवळ पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. आवश्यकता भासलास आधी
खोदलेल्या चरांद्वारे अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.झाडावरील पानसोट काढून टाकावेत. दोन
ओळीमधील मोकळ्या जागेत उडीद, मुग, सोयाबीन, भुईमुग इत्यादी पिकाची आंतरपीक म्हणून
लागवड करावी. हिरवळीच्या खताच्या उपलब्धतेसाठी धेंचा किंवा ताग 40 किलो प्रती हेक्टर बियाणे
या प्रमाणात पेरणी करावी. जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असल्याची खात्री आणि वाफसा आल्यानंतर
भरून ठेवलेल्या खड्ड्यांमध्ये संत्र वर्गीय फळझाडांच्या कलमांची लागवड करावी. कलमा लावतांना
कलमांचा डोळा 15 ते 20 सेंमी उंचीवर असावा. कलमा लावण्यापूर्वी मुळांना मेफेनोक्झाम एम
झेड-68 2.5 ग्राम आणि कार्बेन्डाझीम 50% डब्ल्यूपी 1 ग्राम प्रती 1 लिटर पाणी या प्रमाण द्रावण
तयार करून बुडवून नंतर लावावीत.

वाचा: टोमॅटोने जुन्नरच्या शेतकरी दाम्पत्याला बनवले करोडपती! कमावले तब्बल 2 कोटी 30 लाख

वांगे

वांग्याच्या 4 ते 6 आठवड्याच्या वयाच्या रोपांची लागवड वाफसा अवस्थेत करावी. मागील
आठवड्यात झालेला पाऊस व पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतात पाणी साचून राहणार नाही यासाठी सऱ्या फोडाव्या तसेच अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

टोमॅटो

टोमाटोच्या 4 ते 6 आठवड्याच्या वयाच्या रोपांची लागवड वाफसा अवस्थेत करावी. मागील
आठवड्यात झालेला पाऊस व पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतात पाणी साचून राहणार नाही
यासाठी सऱ्या फोडाव्या तसेच अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Chance of heavy rain in next 4 to 5 days in the state; Learn agricultural advice for vegetables and fruits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button