ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

PM Kisan 14 Installment | ब्रेकींग! पीएम किसानचा 14वा हप्ता ‘या’ दिवशी होणार खात्यात जमा, जाणून घ्या राज्यातील पात्र शेतकऱ्यांचा आकडा

PM Kisan 14 Installment | केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. यापैकीच एक असणारी पीएम किसान योजना होय. तर शेतकरी मित्रांनो या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात. हे तर तुम्हाला माहीतच आहे. तसेच पीएम किसान योजनेचे लाभार्थी असणारे शेतकरी आता 14 व्या हप्त्याच्या (PM Kisan 14 Installment) प्रतीक्षेत आहेत. आता याच शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. तर 14 व्या हप्त्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. तसेच राज्यातील किती शेतकरी पात्र झाले आहेत याबाबतची माहिती देखील देण्यात आली आहे.

वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानच्या 14 व्या हप्त्याची तारीख झाली जाहीर, जाणून घ्या कधी होणार खात्यात जमा?

कधी येणार पीएम किसानचा 14 वा हप्ता?

पीएम किसानच्या 14व्या हप्त्याचे पैसे 28 जुलै रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केले जाणार आहेत. तर या दिवशी सुमारे नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 2,000 रुपयांचा हप्ता पोहोचेल. अधिकृत माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम किसानचा (PM Kisan) 14 वा हप्ता जारी करणार आहेत. या योजनेचा मागील हप्ता 27 फेब्रुवारी रोजी कर्नाटकातून जारी करण्यात आला होता. तर महाराष्ट्रातील जवळपास 85 लाख शेतकरी या हप्त्यासाठी पात्र झाले आहेत. या हत्प्यासाठी शेतकऱ्यांची काटेकोरपणे चौकशी केली जात आहे. तसेच त्यांची ई-केवायसी देखील तपासली जात आहे.

वाचा: टोमॅटोने जुन्नरच्या शेतकरी दाम्पत्याला बनवले करोडपती! कमावले तब्बल 2 कोटी 30 लाख

‘अशा’प्रकारे करा ई-केवायसी

  • सर्वप्रथम पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जा pmkisan.gov.in
  • वेबसाइट उघडल्यावर, तुम्हाला स्क्रीनमधील शेतकऱ्याच्या कोपऱ्यात ई-केवायसीचा पर्याय निवडावा लागेल.
  • या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, ए. तुमच्या स्क्रीनवर नवीन पेज उघडेल.
    आता येथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल.
  • आता शोध बटणावर क्लिक करा.
  • यानंतर तुमच्या आधारवरून नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक OTP येईल.
  • आता OTP टाका आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
  • तुमची ई-केवायसी पूर्ण होईल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Breaking! The 14th installment of PM Kisan will be deposited in the account on this day, know the number of eligible farmers in the state

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button