ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Cotton Rate | कापूस उत्पादकांसाठी खुशखबर! कापसाच्या दरात होणार आणखी वाढ, जाणून घ्या कारण…

Cotton Rate | कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सध्या बाजारात कापसाला (Cotton Rate) चांगला दर मिळत आहे. यामुळे शेतकरी खुश आहेतच. मात्र आगामी काळात या दरात वाढ होऊ शकते. यामुळे शेतकऱ्यांच्या आनंदात आणखी भर पडणार आहे. त्याचवेळी देशात यंदा कापूस लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. मात्र, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीतील (Agriculture) कापसाला फटका बसला आहे. याचमुळे शेतकऱ्यांचे देखील आर्थिक (Financial) नुकसान झाले आहे. मात्र, आगामी काळात कापसाच्या दरात वाढ होऊ शकते याची कारणे जाणून घेऊयात.

वाचा: पुढील तीन दिवसांत ‘येथे’ बरसणार मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा

देशातील कापूस लागवड क्षेत्र
भारतात सर्वाधिक कापसाची लागवड (Cotton Cultivation) करण्यात येते. तर जगातील सर्वात मोठा कापसाची निर्यात (Cotton Export) करणारा अमेरिका देश आहे. त्याचवेळी गुजरात आणि महाराष्ट्र ही दोन राज्ये कापूस उत्पादनात (Cotton Production) महत्वाची आहेत. तर यंदा देशात कापूस लागवड 127 लाख हेक्टर झाली आहे. तर राज्यात 45 लाख हेक्टर आणि गुजरातमध्ये 26 लाख हेक्टर इतकी झाली आहे. देशातील 50 टक्के कापूस उत्पादन या दोन राज्यांत होते. या दोन राज्यांतील कापसाच्या आवकेनुसर कापसाचा दर ठरतो.

वाचा: सरकारकडून शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट! आता शेतकऱ्यांना दर वर्षाला मिळणार 12 हजार, कसं ते जाणून घ्या सविस्तर

कापसाच्या दरात का होऊ शकते वाढ?
हवामान विभागाने यंदा मान्सून लांबणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. 15 सप्टेंबरला पाऊस जातो मात्र, यंदा महिन्याच्या शेवटपर्यंत पाऊस राहील असा अंदाज आहे. याच कारणामुळे नवा कापूस बाजारात उशिरा दाखल होऊ शकतो. नवा कापूस बाजारात उशिरा दाखल झाल्यास बाजारात कापसाची आवक कमी होईल आणि याच कारणामुळे कापसाच्या दरात वाढ होऊ शकते. त्याचवेळी आता कापसाला प्रतिक्विंटल 9 हजार ते 10 हजार रुपये इतका दर मिळत आहे. आगामी काळात यात वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे कापूस उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Good news for cotton growers! Cotton prices to rise further, know why

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button