ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Rule Change | आजपासून नियम बदलणार! औषधे महागणार, जाणून घ्या तुमच्या खिशावर परिणाम करणारे ‘हे’ नवे नियम

Rule Change | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत (EPFO) उद्यापासून मोठा बदल (Rule Change) होणार आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याने नवीन आर्थिक (Financial) वर्षात नोकरी बदलली तर त्याचे पीएफ खाते आता आपोआप नवीन नियोक्त्याकडे हस्तांतरित केले जाईल. यापूर्वी ते केवळ सदस्यांच्या विनंतीनुसार हस्तांतरित केले जात होते.

आयटीआर नवीन कर
नवीन आर्थिक वर्षापासून नवीन कर व्यवस्था डीफॉल्ट कर प्रणाली बनेल. जर एखाद्या व्यक्तीने कोणतीही कर व्यवस्था निवडली नाही, तर त्याचा आयटीआर फक्त नवीन कर प्रणाली अंतर्गत भरला जाईल

फास्टॅग
केवायसीशिवाय फास्टॅग उद्यापासून निष्क्रिय होणार आहे. 1 एप्रिलपूर्वी फास्टॅगमध्ये केवायसी अपडेट करणे अनिवार्य झाले आहे.

NPS खाते लॉगिन नियम
आजपासून NPS खात्यात लॉगिन करण्याच्या नियमात बदल होणार आहे. PFRDA ने NPS खात्यात आधार-आधारित प्रमाणीकरण अनिवार्य केले आहे. अशा परिस्थितीत, एनपीएस खात्यात लॉग इन करण्यासाठी, आयडी पासवर्डसह, तुम्हाला आधारशी लिंक केलेल्या मोबाइल नंबरवर प्राप्त झालेला ओटीपी देखील प्रविष्ट करावा लागेल.

वाचा|गव्हाच्या किंमती वाढू नये म्हणून सरकानेच घेतला मोठा निर्णय; शेतकऱ्यांनो तुम्हीच पाहा नेमकं प्रकरण…

डेबिट कार्ड वार्षिक शुल्क वाढणार
ग्राहकांना मोठा धक्का देत SBI ने आपल्या डेबिट कार्डच्या वार्षिक देखभाल शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून नवे नियम लागू होणार आहेत. याशिवाय, SBI क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरण्यावर मिळणारे रिवॉर्ड पॉइंट्सही बंद केले जात आहेत.l

क्रेडिट कार्ड
आजपासून, ICICI बँक एका तिमाहीत त्यांच्या क्रेडिट कार्डवर रु. 35,000 पर्यंत खर्च करणाऱ्या ग्राहकांना एअरपोर्ट लाउंजमध्ये मोफत प्रवेश प्रदान करेल. तर येस बँक एका तिमाहीत 10,000 रुपये खर्च करून देशांतर्गत विमानतळ लाउंजमध्ये प्रवेश देईल.

विमा पॉलिसी
आजपासून विमा क्षेत्रातही बदल होणार आहेत. आता पॉलिसी सरेंडरवरील सरेंडर व्हॅल्यू तुम्ही किती वर्षांमध्ये पॉलिसी सरेंडर केली आहे यावर अवलंबून असेल. नवीन नियम १ एप्रिलपासून लागू होणार आहेत

औषधे महागणार
आजपासून तुम्हाला अनेक औषधांसाठी जास्त पैसे खर्च करावे लागतील. औषध किंमत नियामकाने नॅशनल लिस्ट ऑफ अत्यावश्यक औषधांच्या (NLEM) अंतर्गत पेन किलर, अँटीबायोटिक्स आणि अँटी-इन्फेक्शन औषधे यासारख्या काही आवश्यक औषधांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन किमती १ एप्रिलपासून लागू होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button