ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Electricity Rate | राज्यात वीज दरवाढीचा फटका! 1 एप्रिलपासून नवीन दर लागू, जाणून घ्या किती मोजावे लागतील पैसे?

Electricity Rate | 1 एप्रिल 2024 पासून राज्यात वीज दरवाढीचा (Electricity Rate) फटका ग्राहकांना बसणार आहे. महावितरणच्या सर्व ग्राहकांचा स्थिर आकार वाढणार आहे. त्यातच इंधन अधिभार जोडल्यावर सुमारे 10 टक्के दरवाढ होईल, असा अंदाज आहे. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने मार्च 2023 मध्ये दोन वर्षांसाठी दोन टप्प्यांत वीज दरवाढ (Electricity Rate Hike) मंजूर करण्यात आली होती. त्यानुसार, 1 एप्रिल 2024 पासून ही दरवाढ लागू होत आहे.

घरगुती ग्राहकांसाठी दरवाढ:

  • सिंगल फेज: 116 रुपये ते 128 रुपये
  • थ्री फेज: 385 रुपये ते 425 रुपये

वाचा|दुष्काळाशी लढा देत यशस्वी झाले दांपत्य! ४५ गायींचा गोठा आणि दररोज ४०० लिटर दूध उत्पादन, वाचा यशोगाथा

इतर ग्राहकांसाठी दरवाढ:

  • वाणिज्यिक: 470 रुपये ते 517 रुपये
  • सार्वजनिक पाणीपुरवठा:
    0 ते 20 किलोवॅट: 117 रुपये ते 129 रुपये
    20 ते 40 किलोवॅट: 142 रुपये ते 156 रुपये
    40 किलोवॅटवरील: 176 रुपये ते 194 रुपये
  • कृषी ग्राहक (मीटर नसलेले): 5 हॉर्सपॉवरपर्यंत: 466 रुपये ते 563 रुपये
  • लघू औद्योगिक ग्राहक: 20 किलोवॅटपर्यंत: 530 रुपये ते 583 रुपये
  • पथदिवे: 129 रुपये ते 142 रुपये
  • सरकारी कार्यालये व रुग्णालये: 20 किलोवॅटपर्यंत: 388 रुपये ते 427 रुपये

वीज दरवाढीची कारणे:

  • कोळसा आणि गॅस सारख्या इंधनाच्या किंमतीत वाढ
  • वीज निर्मितीचा खर्च वाढणे
  • वीज वितरणाचा खर्च वाढणे

वीज दरवाढीचा परिणाम:

  • घरगुती बजेटवर बोजा
  • उद्योगांवर बोजा
  • शेतीवर बोजा
  • महागाई वाढणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button