ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी तंत्रज्ञान

Hydroponics fodder | काय सांगता? ‘या’ पद्धतीने उपलब्ध होऊ शकतो सर्वात स्वस्त चारा! जाणून घ्या संपूर्ण माहिती…

आपल्या सर्वांना ठाऊक होत असेल की, मातीविरहित शेती म्हणजेच हायड्रोपोनिक्स.

Hydroponics fodder | हायड्रोपोनिक्स चारा निर्मिती
या तंत्रज्ञानाचे भरपूर फायदे शेतीमध्ये (Agriculture) आहेत तसेच चाराटंचाई साठी या तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन उत्पादन वाढवण्यात भर आणता येऊ शकते. आज चाऱ्याचे वाढते भाव व आपल्या पशूंच्या आरोग्याची काळजी घेत शेतकरी खूप अडचणींना मात देत असतो. या तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्याला कमी खर्चात चारा उपलब्ध करता येईल. त्यामुळे पैसेही वाचतील आणि उत्पादनात भर ही पडेल. पारंपरिक पद्धतीपेक्षा या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कमी वेळेत सकस चारा उपलब्ध होऊ शकतो. नक्की त्यामुळे वेळ आणि पैसा दोन्हीही बचत होते. कमीत कमी पाण्यामध्ये व कमीत कमी क्षेत्रावर नियंत्रित वातावरणात मका, गहू या बियाण्यापासून २० ते २५ सें.मी. उंचीचा चारा उत्पादन करणे होय. हा चारा मुळासकट जनावरांना देता येतो.

Procedure | हायड्रोपोनिक्स द्वारे चारा निर्मिती करण्याची पद्धत
सर्वात अगोदर चारा तयार करण्यासाठी बांबू, तट्या, प्लॅस्टिक ट्रे, 50 टक्के क्षमतेचे शेडनेट, मिनी स्प्रिंकलर किंवा फॉगर सिस्टिम व टायमर यांची गरज असते. या साधनसामग्रीचा वापर करून 72 स्क्वेअर फूट जागेत बसेल असा 25 फूट x 10 फूट x 10 फूट आकाराचा सांगाडा अवघ्या 15 हजार रुपये खर्चात तयार होतो. यामध्ये प्रकाश, तापमान, आर्द्रता आणि पाण्याचे नियंत्रण करून दररोज 100 ते 125 किलो पौष्टिक हिरवा चारा तयार करता येतो. चारा तयार करण्यासाठी मका, गहू, बाजरी, बार्ली याचा वापर केला जातो. धान्याला ई.एम.च्या द्रावणात बीजप्रक्रिया करावी लागते. हे धान्य 12 तास भिजत ठेवून, 24 तास गोणपाटात अंधाऱ्या खोलीत ठेवावे. त्यानंतर प्लॅस्टिक ट्रेमध्ये (3 फूट x 2 फूट x 3 इंच ) साधारणतः 1.5 ते 1.75 किलो बी पसरावे. अशा प्रकारे प्रतिदुभत्या जनावरांना दहा ट्रे या प्रमाणे जनावरांच्या संख्येवरून ट्रेची संख्या ठरवावी. हे प्लॅस्टिक ट्रे हायड्रोपोनिक चारा निर्मिती गृहात सात ते आठ दिवस ठेवावे

वाचा: Sesame Cultivation | उन्हाळी तिळाच्या लागवडीचे तंत्रज्ञान, जाणून घ्या सविस्तर माहिती…

एक इंची विद्युत मोटारीला लॅटरलची जोड देऊन फॉगर पद्धतीद्वारे प्रत्येक दोन तासाला पाच मिनिटे याप्रमाणे दिवसातून सात वेळा पाणी द्यावे. एका दिवसासाठी 200 लिटर पाणी लागते. ही यंत्रणा स्वयंचलित आहे. पाण्याची टाकी उंच ठिकाणी ठेवल्यास सायफन पद्धतीने विद्युत मोटारीचा वापर न हायड्रोपोनिक्‍स चाऱ्यास पाणी देता येते. चाऱ्याची 7 ते 8 दिवसांत 20 ते 25 सें.मी. उंचीपर्यंत वाढ होते. साधारणपणे एक किलो गव्हापासून नऊ किलो, तर एक किलो मक्‍यापासून 10 किलो हिरवा चारा तयार होतो.

वाचा: Humic Acid | ह्युमिक ऍसिड म्हणजे एक वरदानच! आता घरोघरी ‘अशा’प्रकारे ह्युमिक ऍसिड बनवा आणि त्याचा वापर करा

Benefits| हायड्रोपोनिक्स चाऱ्याचे फायदे
• हिरवा चारा निर्मिती केल्यामुळे चाराटंचाई होत नाही.
• कमी जागेत, कमी पाण्यात, कमी कालावधीत, स्वस्तात हिरवा पौष्टिक चारानिर्मिती.
• जनावरांना 90 टक्के चारा पचतो व त्यामुळे त्यांचे आरोग्य सुदृढ राहते.
• पशुखाद्याचा खर्च 40 टक्के कमी आणि यामुळे बराच खर्च वाचला जातो.
• जनावरांच्या रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होते.
• •दुधाच्या फॅटमध्ये वाढ. किमान अर्धा लिटरने दुधात वाढ होते.

ऋतुजा ल. निकम ( MBA AGRI)

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button