ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Land survey | आता जमीनीची मोजणी होणारं काही क्षणात, ‘या’ मशीनसाठी सरकारने दिली कोट्यावधींची मंजूरी

आपल्याला जमीन मोजणी करायची असेल तर सर्वप्रथम ती जमीन किती आहे हे फक्त आपल्याला कागदपत्रावरील (Documents) माहितीवरुन समजते.

Land survey | मात्र, खरीखुरी आपली जमीन किती आहे? हे आपल्याला तेव्हाच समजते जेव्हा आपण जमीन मोजणी (Land survey) करून घेऊ. राज्यात प्लेन टेबल (Play table) पद्धतीने जमीन मोजणी करण्यात येत होती. या जमीन मोजणीसाठी जास्त वेळ लागत होता. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक टोटल मशिनच्या (ईटीएस) (Electronic Total Machine) साह्याने मोजणी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या पद्धतीने करण्यात येणाऱ्या मोजणीसाठी जास्त वेळ लागत असून याच्या अचुकतेबाबत साशंकता निर्माण होत आहे. त्यामुळे एक नवीन पद्धत आली आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया.

रोव्हर मशीन
रोव्हर मशीनमुळे जमीन मोजणी ही उपग्रहाच्या साहाय्याने केली जाणार असल्यामुळे ही मोजणी अचूक असणार आहे. त्यामुळे राज्यात रोव्हर मशिनद्वारे (Rover machine) मोजणी प्रक्रिया कामांना गती आली आहे. राज्य सरकार व जमाबंदी आयुक्त कार्यालयाने रोव्हर मशिन खरेदीसाठी 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे या माध्यमातून राज्यात अडीचशे रोव्हर मशिन खरेदी केल्या जाणार आहेत. यामुळे राज्यात दर महिन्याला सुमारे 10 हजार जमीन मोजणी प्रकरणे निकाली लागणार आहेत.

रोव्हर मशीन
रोव्हर मशीन

वाचाVehicle Parking | ‘अशा’ गाडीचा फोटो पाठवा अन् 500 रुपये मिळवा, गडकरींची नागरीकांना अनोखी ऑफर

शेत जमीन मोजणी
शेतीची मोजणी करण्यासाठी एक विभाग असतो. या विभागास भूमी अभिलेख विभाग असे म्हणतात. या विभागामार्फत कोणत्याही शेतीची शासकीय मोजणी केली जाते. हा विभाग तालुक्याच्या ठिकाणी असतो. पूर्वी जमीन मोजणी करताना आपल्याला अर्ज करावा लागत होता. हा अर्ज तालुका निरीक्षक भूमी अभिलेख कार्यालय यांच्या नावाने करावा लागतो. तसेच, आता जमीन मोजणीसाठी अर्ज करण्यासाठी आता https://emojni.mahabhumi.gov.in/emojni या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करू शकतो.

वाचा: Yojana | शेतकऱ्यांनो सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत ट्रॅक्टर खरेदीवर मिळतय 50% अनुदान

रोव्हर मशिन यंत्रणेमुळे जमीन मोजणीची कार्यवाही सुलभ य जलदगतीने होण्यास मदत मिळणार आहे. त्यामुळे वेळेत मोजणी होऊन पुढील कामे जलद गतीने होतील. तसेच, शेती व प्लॉट यांच्या मोजणीच्या कार्यवाहीमध्ये पारदर्शकता निर्माण होऊन मोजणीही अचूक पद्धतीने करता येईल. त्यामुळे जमिनीच्या हद्दीसाठीचे होणारे तंटे निकाल लागतील.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button