ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

MJPSKY Yojna| उरलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ कधी? देवेंद्र फडणवीस काय म्हणाले; वाचा सविस्तर

MJPSKY Yojna| नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने प्रोत्साहन पर अनुदान देण्यासाठी एक योजना सुरू केली आहे. त्या योजनेचे नाव आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना. या योजने अंतर्गत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून प्रोत्साहन पर 50 हजार रुपये इतकं अनुदान देण्यात येतं. यामध्ये बरेच शेतकरी पात्र झालेले आहेत बऱ्याच जणांची यादीत नाव आलेली आहेत. केवायसी केल्यानंतर यांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. मात्र काही शेतकरी अजूनही असे आहेत ज्यांनी केवायसी करून सुद्धा त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात आलेली नाही. तसेच अजूनही कित्येक शेतकरी आहेत जे यादीत नाव येण्याच्या प्रतीक्षेत आहेत. पुढची यादी कधी येणार या प्रतीक्षेत ते आहेत.

कधी येणार पुढची यादी

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत शासनाकडून देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनपर रकमेसाठी अनेक शेतकरी पात्र ठरले. मात्र काही शेतकऱ्यांची नावं अजूनही यादीत आलेली नाहीत. ती नावं कधी येणार असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. मात्र याबद्दल शासनाकडून आणि प्रशासनाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. याच पार्श्वभूमीवर या संदर्भात माहिती मागवण्यासाठी एक आरटीआय दाखल करण्यात आला होता.

काय होता आरटीआय

यासंदर्भात चौकशीसाठी सहकार क्षेत्राकडे एक आरटीआय (RTI) दाखल करण्यात आला होता. प्रोत्साहन पर अनुदान योजनेसाठी किती शेतकऱ्यांना पात्र करण्यात आलं आहे, किती शेतकऱ्यांची माहिती शासनाकडे उपलब्ध झालेली आहे आणि किती शेतकऱ्यांना अनुदान मिळालं आहे याबद्दलच्या माहितीसाठी हा आरटीआय दाखल करण्यात आला होता. याचं उत्तर अजून प्रतीक्षेत आहे.

काय म्हणाले उपमुख्यमंत्री

अमरावतीमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले, एकूण साडे पंधरा लाख शेतकऱ्यांचे अर्ज आले आहेत. त्यापैकी साडेबारा लाख शेतकऱ्यांना हे अनुदान वितरित करण्यात आलं आहे. उरलेल्या दोन अडीच लाख शेतकऱ्यांचं व्हॅलिडेशन चालू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर पुढची प्रक्रिया होणार आहे. ही प्रक्रिया कधी पूर्ण होणार आणि शेतकऱ्यांच्या खात्यात ही अनुदान पर रक्कम कधी जमा होणार हे बघावं लागेल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button