ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
इतर

Mutual Fund | भवितव्यासाठी गुंतवणूक करायचीये? म्युच्युअल फंडात 100 रुपयांच्या गुंतवणूकीवर मिळवा चांगला परतावा

सर्वांना आपले आणि आपल्या कुटुंबाचे भविष्य (Future) सुरक्षित करायचे असते. त्यासाठी पैशांची गरज आहे. प्रत्येक व्यक्ती लाखो कोटी (Millions) रुपयांची नोकरी (Job) किंवा व्यवसाय (Business) करू शकत नाही.

Mutual Fund | जर तुमचा पगार किंवा व्यवसाय तुम्हाला लाखो कमावण्याची (Earnings) संधी देत ​​नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो 100 रुपये जमा करून तुम्ही करोडपती (Millionaire)कसे बनू शकता. आजच्या महागाईच्या काळात 100 रुपयांत काही येऊ अगर ना येऊ. मात्र, याच 100 रुपयांनी तुम्ही करोडो रुपये कमवू शकता.

म्युच्युअल फंड
आपल्यापैकी अनेकजण म्युच्युअल फंड (Mutual Fund) योजनांमध्ये गुंतवणूकही करत असतील, मात्र आजही असे अनेक लोक आहेत, ज्यांना म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय याची माहिती नसते. आजच्या काळात गुंतवणूक करण्यासाठी चांगला परतावा देणारा आणि जोखीम नसलेला पर्याय म्हणजे म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे फायद्याचे असते. बँकेतील व्याजापेक्षा जास्त परतावा यामध्ये मिळतो. तसेच, दर महिन्याला कमीत कमी रक्कम भरूनही यामध्ये गुंतवणूक करता येते.

वाचा: Ration Card | तुम्हाला किती पगार आहे? आता सरकारच पडताळणी करून ‘या’ रेशन कार्ड धारकांच रेशन करणारं रद्द

म्युच्युअल फंडात करा 100 रुपयांची गुंतवणूक
म्युच्युअल फंडातील SIP मध्ये गुंतवणूक 100 रुपयांपासून सुरू होऊ शकते. यास मायक्रो एसआयपी असे म्हणतात. यामध्ये दर महिन्याला व्यक्तीने 100 रुपयांची दीर्घकाळ गुंतणूक करून करोडो रुपये कमवू शकतात. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळतो. ज्यामुळे तुमचे छोटे भांडवल खूप मोठे होते. तसेच, यामध्ये गुंतवणक सुरू करण्यासाठी तुम्हाला फक्त नाव आणि पत्त्याचा पुरावा द्यावा लागतो.

वाचाPan Card | पॅन कार्ड हरवलंय? तर ‘अशा’ पद्धतीने त्वरित करा डाऊनलोड, जाणून घ्या प्रक्रिया

म्युच्युअल फंड काय आहे?
म्युच्युअल फंड हे लोकांनी गुंतवलेले पैसे एकत्रितरीत्या शेअर मार्केटमध्ये (Share Market) गुंतवून त्यावर मिळणारा लाभांश हा सर्वांना समान वाटून दिला जातो. शेअर मार्केटमध्ये ही गुंतवणूक करण्याचे काम एखादी कंपनी करत असते. ही कंपनी वेगवेगळ्या म्युच्युअल फंड योजना सादर करत असते.

अनेक गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या पैशांचे व्यवस्थापन ही कंपनी करत असते. तसेच, मिळालेले पैसे एकत्रित करून शेअर्स (Shares-Equity), सरकारी रोखे (Government Bonds), डिबेंचर्स (Debentures) इत्यादी पर्यायांमध्ये गुंतवणूक करत असते. यानंतर, आलेला नफा- तोटा हा सर्व गुंतवलेल्या गुंतवणूकदारांमध्ये बरोबर वाटला जातो. दरम्यान, ही गुंतवणूक शेअर मार्केटशी निगडीत असल्यामुळे यावर मिळणारा परतावा चांगला असला तरी त्यामध्ये चढ-उतार होत असून तो नेहमी बदलत राहतो.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button