lang="en-US"> Weather Forecast| अर्रर्र..! शेतकऱ्यांनो राज्यात ‘या' ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा

Weather Forecast| अर्रर्र..! शेतकऱ्यांनो राज्यात ‘या’ ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा

Weather Forecast | कमाल आणि किमान तापमानात खूपच वाढ झाल्याने राज्यातील लोकांची उन्हाने आणि उकाड्याने लाही होत आहे. बहुतांश ठिकाणी कमाल तापमान 34 ते 37 अंश सेल्सिअस दरम्यान तर किमान तापमान 15 ते 26 अंशांच्या दरम्यान आहे. अशा वातावरणातच हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात पावसाचा अंदाज आहे.

वाचामक्याचे दाणे सुकतात पण झाडं हिरवीचं राहतात; जनावरांच्या चाऱ्यासह भरघोस उत्पादनासाठी करा ‘या’ दोन जातींची निवड

कमी दाबाचा पट्टा (Low Pressure Belt) सक्रिय

समुद्रसपाटीपासून 800 मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा छत्तीसगड पासून विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक ते तमिळनाडू पर्यंत विस्तारला आहे. सोबत वाऱ्याचा प्रवाहही खंडित झाला आहे. तसेच पश्चिम बंगाल पासून उत्तर ओडिशा पर्यंत आणखी एक हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. तसेच नैऋत्य राजस्थान आणि आजूबाजूच्या परिसरात दीड किलोमीटरच्या अंतरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

महाराष्ट्रात या ठिकाणी पडणार पाऊस

कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात पावसाची शक्यता आहे. विदर्भात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे, विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यातील तापमानाची स्थिती

वर्धा येथे राज्यातील उच्चांकी 39.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अकोला, अमरावती, सोलापूर येथे 39 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक तर नागपूर, वाशिम, चंद्रपूर, यवतमाळ, जळगाव, परभणी येथे कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त आहे. राज्यातील उर्वरित बहुतांश ठिकाणी तापमान 34 ते 37 अंशांच्या दरम्यान आहे. तर किमान तापमान 15 ते 26 अंशांच्या घरात आहे.

वाचाबाप रे! ब्रिटनमध्ये चक्क रोपट घेतंय जीव; जाणून घ्या नेमकं ‘हे’ रोपट आहे तरी कसं?

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Exit mobile version