ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Seed Production | खरीप हंगामासाठी महाबीजची बीजोत्पादन कार्यक्रम आरक्षण योजना; शेतकऱ्यांनो जाणून घ्या काय मिळणार फायदा?

Seed Production | महाबीजने आगामी खरीप हंगामासाठी बीजोत्पादन (Seed Production) कार्यक्रम आरक्षण योजना राबवण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना (Agriculture) या योजनेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

योजनेची वैशिष्ट्ये:
कालावधी: १० ते ३० एप्रिल २०२४
ध्येय: बीजोत्पादक आणि बीजोत्पादन गावांची निवड सुलभ करणे आणि आरक्षित बीजोत्पादन कार्यक्रमांसाठी वेळेवर पायाभूत बियाणे पुरवठा सुनिश्चित करणे.

वाचा:
निवड: कमीत कमी गावांमध्ये जास्तीत जास्त क्षेत्रावर आणि बियाणे प्रक्रिया केंद्राच्या जवळील गावांमध्ये कार्यक्रम आयोजित केले जातील.
मुख्य घटक: “गाव” – 100% क्षेत्र तपासणी आणि बीजोत्पादकांना नियमित मार्गदर्शन पुरवून बियाण्याची गुणवत्ता राखणे.
भागीदारी शुल्क: शंभर रुपये प्रति एकर

कांदा उत्पादकांसाठी गुडन्यूज! नाफेडने पुन्हा सुरू केली कांदा खरेदी; पण ‘इतका’च कांदा करणारं खरेदी

हेही वाचा:

  • अतिरिक्त लाभ:
  • “बीज ग्राम योजना” अंतर्गत एकाच गावात जास्तीत जास्त बीजोत्पादन कार्यक्रम आयोजित करणे.
  • खरीप 2024-25 मध्ये बियाणे प्रक्रिया केंद्राच्या 50 किलोमीटरच्या आत प्राधान्यक्रम देणे.
  • एका गावात किमान 50 एकर क्षेत्रावर भाजीपाला पिकांसह पीक, वाण आणि दर्जा यांचा समावेश करणे.
  • 3 एकरांपेक्षा कमी क्षेत्रावरील कार्यक्रम टाळणे (तूर, तीळ, जूट सोडून).
  • जास्तीत जास्त बीज गुणांक (एसएमआर) मिळवण्यासाठी योग्य बीजोत्पादक आणि क्षेत्र निवडून एकाच तालुक्यात कार्यक्रम राबवणे.
  • नवीन वाणांचा समावेश करून त्यांच्या बियाण्याची उपलब्धता वाढवणे.
  • शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाबीजच्या संपर्क कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button