ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
इतर

Ration Shop Mini Bank | रेशन धारकांसाठी खुशखबर! आता बँकेत जाण्याची गरजच नाही; रेशन दुकानचं होणारं मिनी बँक, जाणून घ्या नेमका काय मिळणार लाभ?

Ration Shop Mini Bank | रेशन कार्ड साठी राज्य शासनाच्या माध्यमातून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता रेशन कार्ड (Ration Shop Mini Bank) धारकांना बँकेची कामे करण्यासाठी बँकेमध्ये जाण्याची गरजच नाही. ज्याचं कारण म्हणजे आता रेशन दुकानच मिनी बँक बनणार आहे. तर केंद्र शासनाच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग, ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने राज्य शासन आणि रास्त भाव दुकानदार संघटना यांच्याशी सल्लामसलत केली आहे. यातून विविध उपक्रम हाती घेतल्याने रास्त भाव दुकानदारांना व्यवसायाचे नवीन मार्ग उपलब्ध होणार आहेत.

रेशन दुकानदारांना व्यवसायाचे नवीन मार्ग उपलब्ध
राष्ट्रीयीकृत बँका, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) व खाजगी बँका (अनुसूची -2 अंतर्गत सूचीबद्ध) यांच्या सेवा राज्यातील सर्व शिधावाटप / रास्त भाव दुकानांमधून उपलब्ध करून दिल्यास तसेच शिधावाटप / रास्त भाव दुकानदारांस बँकांचे व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून नियुक्त केल्यास रास्त भाव दुकानदारांना व्यवसायाचे नवीन मार्ग उपलब्ध होतील. सर्व बँकांमार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा रास्त भाव दुकानांमार्फत दिल्या जाऊ शकतात. हे दोन्ही विभागांसाठी परस्पर फायदेशीर ठरू शकते, बँकांना अतिरिक्त व्यवसाय उपलब्ध होईल आणि त्याच बरोबर रास्त भाव दुकानदारांचे उत्पन्न सुधारेल.

वाचा: अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

रेशन धारकांना होणार मोठा लाभ
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यामुळे बँकांमार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचतील. अशाप्रकारे, सामान्य लोकांसाठी, विशेषत: दुर्गम भागात बँकिंग आणि नागरिक केंद्रित सेवा मोठ्या प्रमाणात सुधारतील. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी रास्त भाव दुकानदारांमध्ये जागरूकता निर्माण करून जेथे शक्य असेल तेथे बँकांच्या सेवा प्रदान करता येतील. हा उपक्रम यशस्वी झाल्यास लाखो लोकांच्या जीवनमानात सुलभता येऊ शकते.

शिधावाटप / रास्त भाव दुकानदारांना होणारा लाभ आणि संधी
1) बँकांकडून रास्त भाव दुकानदारांना त्यांनी ग्राहकांना प्रदान केलेल्या विविध उत्पादनांसाठी/ सेवांसाठी वाढीव महसूल प्राप्त होईल.
2) बँकांमार्फत विविध वित्तीय संस्थांच्या सहयोगाने ग्राहकास कर्ज सुविधा उपलब्ध होतील.
3) रोखविरहित व डिजिटायझेशनच्या माध्यमातून सर्व व्यवहार सुलभ, जलद व सुरक्षितपणे करता येतील.
4) “दुकानामध्ये दुकान” (“Shop-in-a-Shop”) अशा प्रकारे रास्त भाव दुकानांच्या माध्यमातून विविध उत्पादन / सेवा पुरविल्यामुळे पुरवठा वाढेल तसेच क्रॉस-सेलींगची शक्यताही वाढेल.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

5) रास्त भाव दुकानदारांना बँकांसोबत काम करण्याची आणि बँकांची उत्पादने व सेवा वितरीत करण्याची संधी मिळेल.
6) 100% डिजिटल व्यवहार.
7) राष्ट्रीयीकृत बँका, खाजगी बँका (अनुसूची-२ अंतर्गत सूचीबद्ध), इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक या विविध बँकांच्या ब्रँड अंतर्गत प्रसिद्धी आणि विपणन.
8) विक्री व्यावसायिक प्रतिनिधी (नियमित मासिक कमाईवर आधारित) म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते.

Web Title: Good news for ration holders! No need to go to the bank anymore; Mini bank of ration shop, know what exactly will be the benefit?

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button