इतर

Ration Card | रेशन कार्डधारकांसाठी महत्वाची बातमी! ‘ही’ प्रक्रिया केली तरचं मिळणार धान्य अन्यथा होणारं बंद

Ration Card | रेशन कार्ड हे केवळ ओळखीचे दस्तऐवज नसून ते सरकारी रेशन धान्य देखील पुरवते. जर कोणाकडे नसेल तर तो अनेक सरकारी योजनांचा लाभ मिळण्यापासून वंचित राहू शकतो. कोरोना महामारी सुरू झाल्यापासून सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या (Prime Minister Poor Welfare Scheme) माध्यमातून देशातील 80 कोटी लोकांना मोफत रेशनचे वाटप सुरू केले आहे. ‘वन नेशन वन रेशन कार्ड योजने’अंतर्गत आता तुम्हाला देशातील कोणत्याही सरकारी रेशन (Ration Card) दुकानातून रेशन मिळू शकेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक (Ration Card Aadhaar Card Link) असणे आवश्यक आहे. तुमचे रेशन कार्ड आणि आधार लिंक नसल्यास तुम्हाला रेशन मिळणे बंद होऊ शकते.

वाचा: बिग ब्रेकिंग! राज्य सरकारकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर, जाणून घ्या कोणता जिल्हा कोणाकडे?

काय आहे उद्देश?
रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यामागचा उद्देश सरकारच्या ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजनेची योग्य अंमलबजावणी करणे हा आहे. यामुळे लाभार्थ्यांना (Financial) देशभरातून कुठूनही रेशन मिळू शकेल, असा लाभ मिळणार आहे. यासोबतच शिधापत्रिका आधारशी लिंक केल्यास त्यामधील फसवणुकीलाही आळा बसेल आणि अपात्र व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

लिंक करण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन सुविधा उपलब्ध
सरकारने रेशन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पर्याय दिले आहेत. शिधापत्रिका ऑफलाइन आधार कार्डशी लिंक करण्यासाठी तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स, शिधापत्रिकेची प्रत आणि शिधापत्रिकाधारकाचा (Finance) पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन डेपोवर जमा करावा लागेल. तुम्ही रेशन डेपोवर तुमच्या आधार कार्डचे बायोमेट्रिक डेटा व्हेरिफिकेशन देखील करू शकता.

वाचा: पीएम किसानच्या 12 व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट; लाभार्थी यादीत त्वरित तपासा तुमचे नाव

‘असे’ करा ऑनलाइन लिंक
• सर्वप्रथम आधार uidai.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
• त्यानंतर Start Now या पर्यायावर क्लिक करून तुमचा पत्ता भरा.
• त्यानंतर राज्य आणि जिल्ह्याची माहिती भरा.
• यानंतर ‘रेशन कार्ड बेनिफिट’ हा पर्याय निवडा.
• पुढे, आधार, रेशन क्रमांक आणि ई-मेल पत्ता भरा.
• यानंतर, आधारशी लिंक केलेल्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी येईल, जो प्रविष्ट करावयाचा आहे.
• ही प्रक्रिया केल्यास तुमचे रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक होईल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Important news for ration card holders! If process is done, the grain will be obtained otherwise it will be closed

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button