ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
पशुसंवर्धन

Pregnant Goat Care | पशुपालकांनो पावसाळ्यात ‘अशी’ घ्या गाभण शेळ्यांची काळजी

वातावरणातील बदलामुळे गाभण शेळ्यांचे आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. हे लक्षात घेऊन काळजी घेणे आवश्यक आहे.
गोठ्यात पावसाचे पाणी असल्यास शेळ्यांमध्ये आजारांचे (Goat Disease) प्रमाण वाढते. दुर्गंधीयुक्त वातावरणाचे प्रमाण वाढून डोळे, खूर व श्‍वास-नलिकेचे आजार होण्याची शक्यता असते. वातावरणातील वाढलेल्या आर्द्रतेमुळे जंतुसंसर्ग (Bacterial Infection Due To Humidity) आजार होण्याचे प्रमाण देखील वाढते. गोठ्यातील अस्वच्छतेमुळे गाभण शेळ्यांमध्ये (Pregnant Goat ) कासेचे आजार होण्याचे प्रमाण अधिक असते. म्हणून गोठा हा नेहमी स्वच्छ व कोरडा ठेवावा.

Food and water planing |आहार आणि पाणी नियोजन :
• शेळ्यांना परिसरात सकाळी बाहेरील वातावरणात चरण्यासाठी सोडू नये.
• ओल्या चाऱ्याची साठवणूक ( storage of green Grass)केल्यास त्याला बुरशी (fungus) लागण्याची शक्यता असते. असा चारा खाल्ल्याने शेळ्यांमध्ये पोटाचे विकार( stomach disease), गर्भपात ( abortion) होण्याची शक्यता असते. त्यामुळे ओल्या चाऱ्याची साठवणूक करू नये.
•ओल्या चाऱ्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. परिणामी, त्यांना लागणारे आवश्यक घटक मिळत नाहीत. म्हणून आहारात ओल्या चाऱ्यासोबातच सुक्या चाऱ्याचा समावेश करावा.
• बंदिस्त शेळीपालनामध्ये चारा हा उंचावर टांगून ठेवावा, जेणेकरून तो तुडवला जाणार नाही. खराब होणार नाही.
• गाभण शेळ्यांना २४ तास स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे.

वाचा: अरे वाह! मुळा पिकवून शेतकरी मिळवू शकतात मोठी कमाई, जाणून घ्या लागवडीचा सोपा मार्ग

First aid | प्राथमिक उपाय :
•पावसाळा सुरू होण्यापूर्वी गाभण शेळ्यांना जंतुनाशक द्यावे.
•सर्दी, बुळकांडी, हगवण इ. सारख्या आजारापासून शेळ्यांचा वेळीच बचाव करावा.
•गोठ्या शेजारी साठलेल्या पाण्यामुळे माश्या, डास, गोचीड (insect) यांचे प्रमाण वाढते. हे सर्व घटक आजार पसरविण्यासाठी कारणीभूत असतात. म्हणून पाण्याचा साठा गोठ्यामध्ये होऊ देऊ नये.
•पावसाळ्यामध्ये जखमांवर माश्‍या बसून त्या चिघळणार नाहीत याची काळजी घ्यावी. माशांवर नियंत्रण आणावे. कडुनिंब, निरगुडी, करंज पाला किंवा औषधाचा वापर करून गोठ्याचे निर्जंतुकीकरण करावे.
• आजाराचे प्राथमिक लक्षण (symptoms)दिसताच पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य उपचार करावेत.

वाचा: भारत जगाची भूक भागवेल! असं पंतप्रधान म्हणाले, पण भारताचं काय?

Pregnent goat care | गाभण शेळ्यांची निगा :
• शेळ्या विण्याच्या (delivery)एक महिना आधी आणि विल्यानंतर एक महिना खुराक द्यावा.
•गाभण शेळ्यांचा आहारामध्ये प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्व, पाण्याचे योग्य प्रमाण असावे.
•शेळी विण्याच्या एक आठवडा आधी हिरव्या वैरणीचे प्रमाण कमी करून त्याऐवजी सकस वैरण द्यावी.
•गाभण काळातील शेवटच्या आठवड्यात शेळ्यांना चरण्यासाठी बाहेर सोडू नये. गाभण शेळ्यांना कळपात न ठेवता इतरांपेक्षा वेगळे ठेवावे. शेवटच्या आठ दिवसांत खुराक शंभर ग्रॅमने कमी करावा.
•विण्याची तारीख नोंद करून ठेवावी. त्यावर लक्ष ठेवावे. शेळी विण्याच्या वेळी आडल्यास त्वरित पशुवैद्यकास संपर्क करा .

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button