ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
PM KISANकृषी बातम्या

PM Kisan | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! नव्या वर्षात वाढणार पीएम किसानचा हप्ता, शेतकऱ्यांना मिळणारं ‘इतके’ पैसे

PM Kisan | पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 2000 रुपयांच्या हप्त्याचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी (Department of Agriculture) ही बातमी अतिशय उपयुक्त आहे. खरं तर, असे म्हटले जात आहे की, सरकार केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक आर्थिक (Financial) मदतीच्या रकमेत वाढ करण्याची घोषणा करू शकते. यामुळे पीएम किसानच्या (PM K lbisan) लाभार्थ्यांना गुड न्यूज मिळण्याची शक्यता आहे.

किती होणार वाढ?
अहवालात असे म्हटले जात आहे की, वार्षिक मदतीची रक्कम चार हप्त्यांमध्ये 8,000 रुपये केली जाऊ शकते. पीएम-किसान योजनेंतर्गत (PM Kisan Yojana) सर्व जमीनधारक शेतकऱ्यांच्या कुटुंबांना प्रति वर्ष 6,000 रुपयांचा आर्थिक (Finance) लाभ दिला जातो, जो प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये देय आहे.

पुढचा हप्ता कधी येईल?
सरकार जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात पैसे हस्तांतरित करेल असा विश्वास आहे. मात्र, याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर नोंदणी करावी लागेल. यासोबतच तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करावे, अशीही अट आहे. नोंदणीसाठी, शेतकऱ्यांना त्यांच्या रेशनकार्डचे तपशील अपलोड करावे लागतील आणि इतर आवश्यक कागदपत्रांच्या सॉफ्ट कॉपी जमा कराव्या लागतील.

‘अशा’प्रकारे तुम्ही नोंदणी करू शकता
प्रथम तुम्हाला पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. आता फार्मर्स कॉर्नरवर जा. येथे तुम्हाला ‘नवीन शेतकरी नोंदणी’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला आधार टाकावा लागेल. यासोबत कॅप्चा कोड आणि स्टेट टाका. यानंतर तुम्हाला पर्याय निवडावा लागेल आणि नंतर प्रक्रियेस पुढे जावे लागेल. या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती भरावी लागेल. तसेच बँक खाते तपशील आणि शेतीशी संबंधित माहिती भरावी लागेल. त्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Good news for farmers! PM Kisan’s installment will increase in the new year, farmers will get money

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button