ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

PM Kisan 14 Installment | ब्रेकींग! राज्यातील 85 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचा 14वा हप्ता होणार ‘या’ दिवशी जमा; अधिकृत ट्विट जाहीर

PM Kisan 14 Installment | केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. यापैकीच एक असणारी पीएम किसान योजना होय. तर शेतकरी मित्रांनो या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात. हे तर तुम्हाला माहीतच आहे. तसेच पीएम किसान योजनेचे लाभार्थी असणारे शेतकरी आता 14 व्या हप्त्याच्या (PM Kisan 14 Installment) प्रतीक्षेत आहेत. आता याच शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. तर 14 व्या हप्त्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. तसेच राज्यातील किती शेतकरी पात्र झाले आहेत याबाबतची माहिती देखील देण्यात आली आहे.

कधी होणार हप्ता जमा?

महाराष्ट्रातील 85.66 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना 1866.40 कोटी रुपयांचा लाभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 27 जुलैला वितरित करण्यात येणार आहे. हा निधी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत त्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित केला जाणार आहे. याबाबतचे ट्विट जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ही आनंदाची बातमी लवकरच मिळेल.

वाचा: Loan waiver | राज्य शासनाचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांची पिक कर्जे होणार माफ; ‘इतक्या’ कोटींचा निधी वितरणास मान्यता, जाणून घ्या तुम्हाला मिळणार का कर्जमाफी?

कधी कराल ई-केवायसी?

  • सर्वप्रथम पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जा pmkisan.gov.in
  • वेबसाइट उघडल्यावर, तुम्हाला स्क्रीनमधील शेतकऱ्याच्या कोपऱ्यात ई-केवायसीचा पर्याय निवडावा लागेल.
  • या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुमच्या स्क्रीनवर नवीन पेज उघडेल.
    आता येथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल.
  • आता शोध बटणावर क्लिक करा.
  • यानंतर तुमच्या आधारवरून नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक OTP येईल.
  • आता OTP टाका आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
  • तुमची ई-केवायसी पूर्ण होईल.

बोगस बियाणे कायदा

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: The 14th installment of PM Kisan will be deposited in the accounts of 85 lakh farmers in the state on this day, official tweet announced

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button