ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
शासन निर्णय

गूळ प्रकल्पासाठी आता सरकारकडून ५० टक्के अनुदान; “या” जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात…

शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी केंद्रसरकार विविध योजनांअंर्गत शेतकऱ्यांना व्यवसायिक प्रशिक्षण किंवा अनुदान देत असते. सध्या आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत एक जिल्हा एक उत्पादन असा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमाद्वारे रसायनमुक्त गूळ प्रकल्पासाठी केंद्र सरकार ३५ % अनुदान देणार आहे.

वाचा –

एकूण ५० टक्के अनुदान मिळणार

रसायनमुक्त गूळ प्रकल्प साकारण्यासाठी केंद्र सरकार (Central Goverment) च्या ३५ टक्के अनुदानासोबतच आता राज्यसरकार देखील १५ टक्के अनुदान देणार आहे. यामुळे या प्रकल्पासाठी एकूण ५० टक्के अनुदान उपलब्ध होणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणी साठी निपाणी तालुक्यात सुरवात झाली असून यासाठी रयत केंद्राकडून इच्छुक शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यामुळे आता ३० लाखाच्या प्रकल्पासाठी १५ लाखाचे अनुदान प्राप्त होत आहे. प्रकल्प राबविताना नवीन जागरी युनिट उभारावे लागणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना सुरुवातीला तीन लाख गुंतवावे (Invest) लागणार आहेत.

वाचा –

शेतकऱ्यांना असे प्राप्त होणार अनुदान

या प्रकल्पाच्या अनुदानासाठी बेळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. आता दाखल झालेल्या अर्जावर युनिटचा आराखडा बनविण्यासाठी खात्याचे अभियंते व कर्ज देणारया बॅंकेचे अधिकारी अर्जधारकाच्या माहितीसह नियोजित जागेची पाहणी करून लाभार्थ्याला सहकार्य (Help) करणार आहेत. इच्छुक शेतकरयांनी अर्जासोबत कागदपत्रे, दाखले देण्यासह अधिक माहितीसाठी (Information) कृषी खात्याच्या (Agriculture department) रयत संपर्क केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button