ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
इतर

Technology | टेक्नॉलॉजीसे कुछ छुपता नही बॉस! बनावट नोटा ओळखण्यासाठी वापरा ‘हे’ ऍप्स

आर्थिक सुरक्षिततेसाठी पैसा ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. यामुळे बाजारात चलनी नोटांचे मूल्य अधिक असते. बरेचदा बनावट नोटा (Counterfeit note) वापरून फसवणूक केली जाते.

Technology | अशावेळी आपण सतर्क (Alert) राहणे आवश्यक आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये बनावट नोटा चलनात येण्याच प्रमाण १९७ पटीने वाढलं आहे. या नोटांमुळे आपलं मोठं नुकसान होऊ शकत. म्हणून वेळीच खऱ्या नोटांची ओळख करून घेणं आवश्यक आहे. यासाठी आपण टेक्नॉलॉजीची (Technology) मदत घेऊ शकतो.

खऱ्या नोटा ओळखणारे ऍप
काही मोबाईल ऍप्सद्वारे नोटा ओळखणे आता सोप्पे झाले आहे. यामध्ये INR Fake Note Check Guide, Counterfeit Money Detector, Chkfake App यांचा समावेश होतो.

INR Fake Note Check Guide
सामान्य लोकांना बनावट नोटांपासून जागरूक करण्यसाठी हे ऍप वापरले जाते. या ऍपद्वारे बनावट आणि खऱ्या नोटांमधील फरकाची माहिती नोटिफिकेशन्सच्या माध्यमातून दिली जाते.

वाचा: Pan Card | पॅन कार्ड हरवलंय? तर ‘अशा’ पद्धतीने त्वरित करा डाऊनलोड, जाणून घ्या प्रक्रिया

Counterfeit Money Detector
हे अ‍ॅप जगभरातील सर्व देशांच्या बनावट नोटा ओळखण्यासाठी खास बनवण्यात आलं आहे. त्यामुळे यात तुम्हाला तुमचा देश निवडावा लागेल. जर तुम्ही परकीय चलन हाताळत असाल तर हे अ‍ॅप तुम्ही नक्की डाउनलोड करू शकता.

Chkfake App
या अ‍ॅपमध्ये फोटो अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्या नोटेविषयी माहिती शोधून दिली जाते. कोणत्याही नोटेची माहिती या ऍपमधून मिळू शकते, त्यामुळे बनावट आणि असली नोटांमधील फरक समजण्यास मदत होते. हे ऍप iOS आणि Android दोन्ही युजर्ससाठी उपलब्ध आहे.

वाचा: Mahindra | शेतकऱ्यांची राणी आली रे! महिंद्रा कंपनीने महिंद्रा स्कॉर्पिओ एन केली लॉन्च, जाणून घ्या फीचर्स

सजग असणे महत्त्वाचे
सध्याच्या काळात नागरिकांनी सजग राहणे महत्त्वाचे आहे. कुठूनही, कशीही आणि कधीही आपली फसवणूक होऊ शकते. अशावेळी योग्य ती खबरदारी घेऊन आपले नुकसान टाळता येऊ शकते.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button