lang="en-US"> शेतकऱ्यांच्या जीवात 'जीव' आणणारी बातमी, यंदा रब्बीसाठीही उजनीतून सोडले जाणार

शेतकऱ्यांच्या जीवात ‘जीव’ आणणारी बातमी, यंदा रब्बीसाठीही उजनीतून सोडले जाणार ‘एवढे’ पाणी

सोलापूर : सोलापूर, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यासाठी उजनी धरण हे वरदान ठरलेले आहे. मागच्या वर्षी समाधानकारक पाऊस (Rain) झाल्याने उजनी धरण अजूनही पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. यामुळे यंदा सोलापूर, अहमदनगर आणि पुणे या जिल्ह्यांना पाणी टंचाई जाणवणार नसून 27 जानेवारीला रब्बी पिकांसाठी (Rabbi crops) कॅनॉल, बोगदा व उजवा आणि डाव्या कालव्यातून पाणी सोडले जाणार आहे.

म्हणून रब्बी पिकांसाठीही सोडणार पाणी

सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रब्बी पीके घेतली जातात. मागच्या काही वर्षात मात्र करखानदारीमुळे इथे खरीप पिकांचे क्षेत्र देखील वाढले आहे. खरीप पिकांचे क्षेत्र जास्त असल्याने या पिकांसाठीच याआधी उजनी धरणातून पाणी सोडले जायचे परंतु रब्बीखालील पिकांचे क्षेत्र (area) देखील वाढल्याने शेतकऱ्यांकडून शेती पिकांसाठी पाणी सोडण्याची मागणी वाढू लागली आहे. म्हणून जलसंपदा विभागाने २७ जानेवारीपासून उजनीतून पाणी सोडण्याचे नियोजन केले आहे.

एवढे पाणी सोडले जाणार

उजनी धरणात सध्या एकूण 121.62 टीएमसी पाणी असून त्यात 57.96 टीएमसी उपयुक्‍त पाणीसाठा आहे. सध्या धरणातील पाण्याची टक्‍केवारी 108.19 टक्‍के इतकी आहे. यातले जवळजवळ 5 टीएमसी (Tmc) पाणी रब्बी पिकांसाठी सोडले जाणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिली.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Exit mobile version