ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी तंत्रज्ञानकृषी बातम्या

Liquid Nano Urea | आता द्रवरूपात मिळणार नॅनो युरिया! IFFCO चा नवा शोध शेतकऱ्यासाठी आहे अमूल्य भेट

जगात प्रथमच विकसित केले गेलेले नॅनो युरिया हे नॅनोटेक्नॉलॉजी ( Nanotechnology) वर आधारित एक खत आहे. या खताचा वापर केल्याने नायट्रोजनची पूर्तता होते.

Liquid Nano Urea | नॅनो युरिया बद्दल माहिती
यामुळे उत्पादन वाढते व तसेच पर्यावरण( Environment) सुद्धा स्वस्थ राहते. नॅनो युरिया हे द्रव्य पदार्थ असल्याने हे पानांवरती फवारले जाते. आपला दाणेदार युरिया मातीमध्ये अगोदर टाकला जात होता त्यामुळे माती दूषित होते व पर्यावरणाला हानी पोहोचत होती. तसेच ( Government of India) भारत सरकारने या नॅनो युरिया ला मान्यता दिली आहे.

Benefits | नॅनो युरियाचे फायदे
• सुरक्षित व पर्यावरण अनुकूल(Safe and Environment Friendly)
• सर्व प्रकारच्या पिकांसाठी उपयुक्त.
• पिकांवर परिणाम न करता इतर नत्राची युरिया वाचवते.
• वाहतूक व साठवण ( Less Cost) खर्च कमी करता येते.
• फवारणीसाठी सोयीस्कर.
• •उत्पादन वाढण्यास मदत.
• पर्यावरण व माती( Soil health) वरती कोणतेही दुष्परिणाम होत नाही.
• उत्पादकता वाढण्यास मदत करणारे व चांगल्या पद्धतीचे उत्पादन प्राप्त होते.

वाचाBFF Technology | खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बीएफएफ तंत्रज्ञान फायदेशीर, जाणून घ्या बीएफएफ पेरणी यंत्राचा फायदा

Liquid Nano Urea Use| द्रवरूप नॅनो युरियाचा असा वापर करावा
नॅनो युरिया प्रतिलिटर पाण्यात २-४ मिली द्रावणाची फवारणी पिकावर करावी.नॅनो युरिया कमी नत्र आवश्यक असणाऱ्या पिकांमध्ये २ लिटर पाण्यात प्रति लिटर दराने आणि जास्त नायट्रोजन आवश्यक असलेल्या अशा पिकांमध्ये ४ मिली पर्यंत वापर करावा.एक एकर शेतीसाठी १५० लिटर पाणी फवारणीसाठी पुरेसे आहे.

वाचा: Agriculture | शेतकऱ्यांनो ‘या’ शेतीतून अल्पावधीतच मिळवा बक्कळ नफा, जाणून घ्या लागवड आणि व्यवस्थापन पध्दत

Safety tips while using Nano urea | नॅनो युरिया वापरताना घेण्याची खबरदारी
• प्लेट फॅन नोझल चा वापर करावा.
• सकाळी किंवा संध्याकाळी फवारणी केल्यास उत्तम ठरते.
• हे नॅनो युरिया उत्पादनाच्या ( Expiry Date) तारखेपासून दोन वर्षाच्या आत वापरावे. उत्तम परिणाम प्राप्त होतो.
• मुलांच्या व प्राण्यांच्या अवाक्या पासून दूर ठेवा.
• वापर करण्या अगोदर बाटली चांगल्या पद्धतीने हलवून घ्यावी.

Nano Urea price | नैनो युरिया विक्री
५०० मिली बाटलीची किंमत २४० रुपये आहे.www.iffcobazaar.com यावरून तुम्ही घरी बसल्या थेट तुमच्या घरी ऑर्डर सुद्धा करू शकता.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button