ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
इतर

Mosquito Facts | काय सांगता? स्त्रियांपेक्षा पुरुषांना अधिक चावतात डास, जाणून घ्या नेमकं काय आहे कारण

वातावरणात हळूहळू बदल होताना दिसून येत आहे. पावसाळ्याचे (Rain) दिवस तोंडावर आले असतानाच साथीचे रोग पसरण्याची भीती लोकांमध्ये पाहायला मिळते.

Mosquito Facts | बहुतेक साथीचे रोगांमध्ये डास (mosquito) हे वाहक (carrier) असतात. अशावेळी डासांपासून सुरक्षित राहण्यासाठी आपण वेगवेगळ्या उपाययोजना (planning) करतच असतो. या डासांबद्दलच्या काही आश्चर्य करणाऱ्या आणि महत्त्वाच्या गोष्टी (Important Facts) तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे. (Mosquitoes bite men more than women)

स्त्रियांपेक्षा पुरुषांना डास जास्त चावतात
एका संशोधनानुसार घामामुळे शरीरातून बाहेर पडणाऱ्या कार्बन डायऑक्साइडकडे डास आकर्षित (Attract) होत असतात. महिलांच्याच्या तुलनेत पुरुषांना घाम अधिक येतो. हा घामाचा वास डासांना पुरुषांकडे आकर्षित करतो त्यामुळे डास पुरुषांना अधिक चावतात.

वाचा: Health | बाप रे! मागच्या खिशात पाकीट ठेवणे मणक्यासाठी धोक्याच, जाणून घ्या काय आहे कारण

फक्त फिमेल डासच पुरुषांना चावते
पुरुषांच्या शरीरातून जो कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो, तो फिमेल डास (female mosquito) ला अधिक आकर्षित करतो. विशेष म्हणजे फिमेल डास. मानवी रक्ताच्या साहाय्याने गर्भातील अंडी वाढवते. तिच्यासाठी मानवी रक्त प्रोटीनसारखं काम करतं.

पावसाळ्यात डासांचे प्रमाण अधिक असते
पावसाळ्यात पाण्यामुळे किचकिच वाढते. कचरा साठून राहतो आणि दुर्गंधी पसरते. यामुळे डासांची संख्या वाढते. अशावेळी डासांमुळे डेंग्यू,मलेरिया यांसारखे साथीचे रोग होतात.

वाचा: Herbs For Cholesterol | तुम्हालाही उच्च कोलेस्ट्रॉलचा त्रास होतोय? तर ‘या’ वनस्पतींचे करा सेवन, त्वरित मिळेल आराम

सायंकाळच्या वेळीच घरात जास्त येतात
डास सायंकाळच्या वेळी घरात येणाऱ्या डासांची संख्या अधिक असते. संध्याकाळी दारे व खिडक्या उघड्या ठेवल्यास घरात अधिक डास होतात.

‘अशी’ घ्या काळजी
आरोग्य हीच खरी संपत्ती आहे त्यामुळे आपणच प्राथमिक स्तरावर (On primary Level) आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. डासांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ओडोमोस, Good Night कॉईल/ लिक्विड व यांसारखी बाजारात उपलब्ध असणारी इतर उत्पादने वापरावी.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button