ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी तंत्रज्ञान

Modern Potato Agriculture Technology| जमिनीत नव्हे तर हवेत लागवड ! आता बटाट्याची शेती जमिनीत न करता हवेत कशी करता येते जाणून घ्या खाली सविस्तर माहिती..

Potato Cultivation| नवीन तंत्रज्ञानाने बटाट्याची लागवड:

आज ही पर्यंत जे शेतकरी पारंपरिक शेती करतात. त्यामुळे उत्पन्नात भरघोस वाढ होत नाही. सरकार शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन तंत्रज्ञान आणत आहे त्यातलाच एक तंत्रज्ञान म्हणजे एरोपोनिक्स . तर एरोपोनिक म्हणजे नक्की काय? एरोप्लेन एक्स मध्ये शेती हवेच्या माध्यमातून केली जाते. बटाट्याचे पीक सर्वात उपयुक्त असे मानले जाते कारण त्यातून भरघोस उत्पन्न मिळते व बाजार भाव जास्त असतो. बटाटा पासून विविध क्षेत्रांमध्ये पदार्थ बनवले जातात. आपल्याला यात माहीतच आहे की बटाटा चालू आहे जमिनीच्या आत मध्ये उगवला जातो. पण जर आपल्याला बटाट्याची शेती हवेत करता आली तर? हेच नवीन तंत्रज्ञ…
[5:07 PM, 3/5/2022] +91 84850 55589: Moringa Cultivation For Fodder Purpose |आता चाऱ्यासाठी करा शेवग्याची लागवड ! जाणून घ्या खाली सविस्तर माहिती..

शास्त्रीय नाव : Moringa olleifera

आपण सर्वांनी शेवगा ऐकलाच असेल. शेवगा ही जगातील सर्वात उपयुक्त वनस्पती आहे व जलद वाढणारी सुद्धा आहे.अगोदर पासूनच शेवग्याचा मानवाच्या आहारात समावेश आहे. शेवग्याची लागवड ही बहुदा शेताच्या बांधावर किंवा परसात केली जाते. शेवग्याच्या औषधी उपयोगामुळे शेवग्याला जादूचे झाड (Miracle tree) म्हणून सुद्धा ओळखतात. शेवग्याच्या पानात प्रथिने आणि खनिज यांचे प्रमाण उपयुक्त प्रमाणात असल्यामुळे जनावरांच्या वाढीसाठी हे उपयुक्त ठरते. महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी शेवगा लागवड ही शेंगाच्या उत्पादनासाठी केली जाते आणि जनावरांच्या आहारातील उपयुक्तता अजूनही अप्रचलित आहे.
शेवग्याच्या पानातील पोषण तत्वे
शेवग्यामध्ये अधिक पोषण तत्वे असतात ते जनावरांच्या आरोग्यासाठी खूप आवश्यक अशे असतात.क्रूड प्रथिने- 23-25%, पोटॅशियम- 0.24% कॅल्शियम- 0.8%, फॉस्फरस- 0.30%, मॅग्नेशियम- 0.5%, सोडियम- 0.20%, तांबे- 8.78 पीपीएम, झिंक- 18 पीपीएम, लोह- 470 पीपीएम एवढे प्रमाण आढळते.

वाचा- Drenching In Agriculture| भाजीपाल्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी आळवणी कशी उपयुक्त आहे नक्की वाचा.

Moringa Cultivation |लागवड :

शेवग्याची लागवड पावसाळ्याच्या सुरवातीला करावी. साधारणतः लोम किंवा चिकणमाती आणि 6.8 ते 7 च्या आसपास सामू असलेल्या पाण्याचा निचरा होणार्‍या जमिनीमध्ये ही झाडे चांगल्या प्रमाणात वाढतात.लागवड ही वाफ्यांवर/सर्‍यांवर असावी जेणे करून पाणी जास्तवेळ साचणार नाही आणि झाडांची मुळे सडणार नाहीत.शेवगा चार्‍यासाठी अनेक वर्ष चालतो त्यामुळे जमिनीला मुबलक पोषकद्रव्य अगोदरच पुरविली जावी जमिनीला चांगल्या पद्धतीने तयार करण्यासाठी खोल नांगरणी करून घ्यावी. लागवडीच्या पंधरा दिवस अगोदर 10 ते 15 दिवस अगोदर 5 टन प्रती एकरी शेणखताची मात्रा द्यावी आणि जमीन व्यवस्थित करून घ्यावी तसेच लागवडीच्या अगोदर सुपर फॉस्फेट एकरी 55 किलो टाकावे.चांगल्या उगवणीसाठी बियाणे रात्रभर कवकनाशक मिसळलेल्या पाण्यात रात्रभर भिजत ठेवावीत. 30×30 सेमी अंतरावर बियाणाची लागवड करावी.बियाणे उगवल्यानंतर काही रोगांची लक्षणे दिसली तर कृषीतज्ञाकडून सल्ला घेऊन आवश्यक ती फवारणी करावी.

Varieties | चाऱ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रजाती:

PKM-1 आणि PKM-2

Harvesting of Moringa | कापणी :

शेवगाच्या पानांची कापणी ही वनस्पती चे सर्वसाधारण उंची 1.5 ते 2 मीटर झाल्यावर करण्यात यावी. कापणी करताना जमिनीपासून 25 ते 40 से.मी मीटर उंचीवर कापणी करावी. त्यातून नवीन अंकुर फुटण्यास वाव येतो. त्यानंतरचे कापणी प्रत्येकी 35-40 दिवसानंतर करण्यात यावी. शेवगा जरआंतरपीक म्हणून केले गेला तर 2-4 महिन्याच्या अंतरावर कापणी करावी.
शेवगा ही वनस्पती जनावरांच्या चाऱ्यासाठी एक उत्तम स्त्रोत आहे. शेवगा चा वापरामुळे तुलनात्मकदृष्ट्या पाण्याची व मूलद्रव्यांची गरज कमी लागते. यातून चांगल्या प्रमाणात व उत्तम दर्जाचा चारा तयार होतो. शेवगा या वनस्पतीची लागवड बांधावर आंतरपीक म्हणून केली जाऊ शकते व उष्ण प्रदेशात व कमी पर्जन्यमानाचा सुद्धा केली जाऊ शकते. त्यामुळे शेवगा ही वनस्पती जनावरांच्या चाऱ्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.

ऋतुजा ल. निकम( MBA AGRI)

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button