ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

Goat Rearing | शेतकऱ्यांनो शेळीपालन करताय? तर मग जाणून घ्या व्यवस्थापन

Farming | शेळी ( goat) पालन या व्यवसायाकडे एक जोड व्यवसाय (Business) म्हणूनही पाहिलं ग्रामीण भागात तर प्रत्येकाच्या घरी शेळया, मेंढ्या, कोंबड्या यांनच पालन केलं जातं. शेतकरी असले तरी ते शेळीपालन व्यवसाय हा करत असतात. त्याला कारणही तसेच आहे. ते अस की या व्यवसायाला काही भांडवल लागत नाही. शून्य खर्च आणि शून्य देखभाल असा अटाहास असतो.

परंतु शेळी पालन व्यवसाय करताना त्याच योग्य ज्ञान असणे देखील गरजेचे असते. नाहीतर यातून फायदा होण्या ऐवजी खूप मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणताही व्यवसाय करताना आधी त्यासमधी माहिती घेणही तितकाच महत्त्वाचा आहे. चला तर मग जाणून घेऊ या कसा करायचा शेळी पालन व्यवसाय.

कसा असावा शेळ्यांचा गोठा?

सुरवाती जास्त मोठा गोठा किंवा जास्त खर्च हा टाळावा. शेळ्यांचा गोठयाची जागा ही वातावरण नुसार असावी. तसेच गोठ्यात वेगवेगळ्या कप्यात शारीरिक स्थिती नुसार त्यांची विभागणी केली गेली पाहिजे. त्याच प्रमाणे नवीन घेतलेल्या शेळ्या किंवा आजारी शेळ्या यांना ठेवण्यासाठी वेगवेगळी जागा असली पाहिजे. निर्जंतुककरण करण देखील तितकच महत्वाचं आहे.

वाचा: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ऊसाच्या एफआरपीत दरात मोठी वाढ, आता टनामागे मिळणारं ‘इतकी’ रक्कम

शेळ्यांची नोंदवही ठेवण देखील आवश्यक

आपल्या सर्व कामांच्या व्यापातून वेळ काढून आपल्या कामांची नोंद ठेवून गोठ्याची स्वच्छ्ता ठेवण हे देखील महत्वाचं आहे. त्याच प्रमाणे प्रजनन संस्थेचे योग्य ते नियोजन करावं. योग्य त्या ठिकाणाहून योग्य वयाच्या शेळ्या खरेदी कराव्यात. शेळ्यांची वाहतुकीच्या आधी व नंतर योग्य ती काळजी घ्यावी. त्यांचं निरीक्षण ही करत राहील पाहिजे.

नेमक काय निरीक्षण केले गेलं पाहिजे

शेळ्यांचा निरीक्षण करण फार महत्वाचं आहे. त्यातून आपल्याल कळत की त्या कोणत्या एखाद्या रोगाला बळी तर नाही पडत आहेत. आणि त्याच बरोबर त्याचे रक्त आणि लेंड्या यांचं देखील वेळोवेळी चाचणी करून घेतली पाहिजे. शेळ्यांना योग्य वेळी लसीकरण करावं. शेळ्यांनच निर्जंतुककरण करावं. जर शेळ्यांना काही आजार झाला असेल आणि ते जर आपल्याला कळत नसेल तर त्यांना तबळतोब पशुवैद्यकडे घेवून जावून मार्गदर्शन घ्यावं. आणि तो आजार दुसऱ्या शेळ्यांना तो होवू नये याची खबरदारी घेतली पाहिजे. तसच निरुपयोगी शेळया गोठ्यातून काढून टाकाव्यात.

वाचा:आता भारतीय कापसाच्या मार्केटिंगसाठी नवा ब्रँड! शेतकऱ्यांना ‘असा’ होणार फायदा

खाद्याच व्यवस्थापन कस करावं

ओला व सुका चारा याच योग्य ते व्यवस्थापन करावं. शेळ्यांना योग्य वेळी योग्य तो खुरक देणं देखील तितकच महत्वाचं आहे. पाण्याची सोय ही स्वच्छ आणि योग्य असली पाहिजे. शेळ्यांना खनिज मिश्रणे द्यावीत.

कस करावं विक्रीच नियोजन

शेळया ह्या जिवंत वजनार विकल्यास याचा मोठा फायदा होतो. शेळीच्या मटणाच्या निर्यातीवर लक्ष व भर दिल्यास योग्य तो फायदा मिळतो. आणि स्वतःच मटनाच दुकान असल्यास याचा आणखीनच जास्त फायदा होतो. दुसऱ्याचा गोठ्याची कॉपी करण्या पेक्षा आपल्या आर्थिक परिस्थिती नुसार नियोजन केल्यास त्याचा फायदा हा जास्त असतो. शेळीची विक्री करताना थेट ग्राहकाशी संपर्क साधावा. विक्रीच पूर्व नियोजन केल्यास त्याचा जास्तीत जास्त फायदा हा आपल्याला होतो.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button