ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Incentive Grant | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! 50 हजारांच्या अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी कार्यवाही सुरू, परिपत्रक जारी

Good news for farmers! Proceedings started for farmers deprived of subsidy of 50 thousand, circular issued

Incentive Grant | शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पैशांची गरज भासते. यासाठी शेतकऱ्यांना कर्ज घ्यावे लागते. आपल्या पिक कर्जाची वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. तर नियमितपणे आपल्या पिक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले योजनेंतर्गत 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान (Incentive Grant) देण्यात येत आहे. याबाबत प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांसाठी अपडेट आले आहे.

वाचा : Incentive Grant | गुडन्यूज आली रे! 50 हजारांच्या अनुदानाची चौथी यादी प्रकाशित, त्वरित ‘या’ लिंकवर तपासा तुमचं नाव…

Circular issued for underprivileged farmers वंचित शेतकऱ्यांसाठी परिपत्रक जारी
महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना – 2019 व अंतर्गत प्रोत्साहन पर अनुदानाची एकूण 1 लाख 12 हजार 489 शेतकरी सभासदांची जिल्हा मध्यवता सहकारी बँक व इतर बँकांची माहिती शासन पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली आहे. पैकी एकूण 57983 शेतकन्यांना रक्कम रुपये 21,520 कोटी प्रोत्साहन पर लाभ वितरीत करण्यात आलेला आहे.

उर्वरीत 54,506 खात्यापैकी सुमारे 21,965 खाती अपात्रतेच्या यादीमध्ये व 29,047 कर्ज खाती एक वर्षाच्या आतिल असल्यामुळे प्रोत्साहनपर लाभास पात्र नाहीत. ही बाब सहकार विभागाचे राज्यस्तरीय समन्वयक यांनी निदर्शनास आणून दिलेले आहे. यासाठी परिपत्रक जारी करून वंचित शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

Who will be eligible for the benefits of the scheme? | योजनेच्या लाभासाठी कोण असेल पात्र?
सदर योजनेसाठी केवळ राष्ट्रीय एकत बँका खाजगी बँका ग्रामीण बँका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका. तसेच विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थाने बँकांकडून कर्ज घेऊन किंवा स्व निधीतून शेतकऱ्यांना दिलेले अल्पमुदत पीक कर्ज विचारात घेण्यात येईल. याचप्रमाणे सन 2019 वर्षांमध्ये राज्य झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झालेल्या नैसर्गिक आपत्ती अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी योजनेस पात्र असतील. तसेच एखादा शेतकरी मयत झाल्यानंतर त्याच्या वारसानी कर्जाची परतफेड केली असल्यास वारसही प्रोत्साहनपर योजनेच्या लाभास पात्र असतील.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा :

Web Title: Good news for farmers! Proceedings started for farmers deprived of subsidy of 50 thousand, circular issued

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button