ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Incentive Subsidy | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! 50 हजारांचे अनुदान ‘इतक्या’च दिवसांत होणार खात्यात जमा

Incentive Subsidy | नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. 2019-20-21 या तीन वर्षातील किमान 2 वर्षे आपल्या पीक कर्जाची (Crop Loan) परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान (Subsidy) देण्यात येणार आहे. हे अनुदान शेतकऱ्यांना (Department of Agriculture) महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत (Financial) मिळणार आहे. याच अनुदानासंदर्भात एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.

PM Kisan | अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी जबरदस्त घोषणा; जाणून घ्या पीएम किसानची रक्कम वाढली का?

50 हजार खात्यात जमा होण्यास सुरुवात
पहिल्या आणि दुसऱ्या यादीमध्ये पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आता महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आहे. हे अनुदान शेतकऱ्यांच्या (Agricultural Information) खात्यावर 1 फेब्रुवारी 2023 पासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ज्या शेतकऱ्यांची (Department of Agriculture) ई-केवायसी पूर्ण झाली आहे. जे शेतकरी पात्र आहेत, पहिल्या आणि दुसऱ्या यादीमध्ये ज्यांची नावं आहेत. त्या शेतकऱ्यांना हे अनुदान मिळण्यास सुरुवात झाली आहे. हे प्रोत्साहन अनुदान (Incentive Grant) शेतकऱ्यांच्या खात्यांवर येत्या तीन दिवसांत जमा होणार आहे.

नादचखुळा! लाल केळीच्या लागवडीतून इंजिनियर तरुण घेतोय तब्बल दीड कोटींचं उत्पन्न, जाणून घ्या कसं करतोय व्यवस्थापन?

ऑनलाईन पोर्टल विकसित
महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 50 हजारांचे अनुदान (Subsidy) लवकरात लवकर मिळावे यासाठी राज्य शासनाने थेट ऑनलाइन पोर्टल विकसित केले आहे. हे ऑनलाइन पोर्टल ‘महाआयटी’द्वारे विकसित करण्यात आले आहे. या ऑनलाइन पोर्टलमुळे शेतकऱ्यांना (Type of Agriculture) महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचे अंतर्गत मिळणाऱ्या प्रोत्साहन अनुदान तात्काळ मिळणार आहे.

ई-केवायसी केलेल्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ
प्रोत्साहन अनुदानाच्या लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक झाले आहे. यामुळेच शेतकऱ्यांची (Agricultural Information) फसवणूक होणार नाही आणि प्रत्येक पात्र शेतकऱ्याला ही मदत मिळणार आहे. ज्याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांना त्यांची पात्रता सिद्ध करावी लागणार आहे. म्हणजेच आधार कार्ड, इतर कागदपत्र अपडेट करावी लागणार आहेत.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Good news for farmers! 50,000 subsidy will be deposited in the account in days

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button