ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Subsidy | ब्रेकींग! प्रोत्साहन अनुदानाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी ‘इतक्या’ कोटींच्या निधी वितरणास मंजुरी, जाणून घ्या कधी येणार खात्यात?

Subsidy | नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. 2019-20-21 या तीन वर्षातील किमान 2 वर्षे आपल्या पीक कर्जाची (Crop Loan) परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान (Subsidy) देण्यात येणार आहे. हे अनुदान शेतकऱ्यांना (Department of Agriculture) महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत (Financial) मिळणार आहे. याच अनुदानाच्या 17 जानेवारी 2022 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य शासनाचा मोठा निर्णय
प्रोत्साहन अनुदानाच्या पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 8 लाख शेतकरी पात्र झाले होते. त्या शेतकऱ्यांना हे प्रोत्साहन अनुदानाची (Subsidy) रक्कम खात्यामध्ये वितरित करण्यात आली होती. परंतु, तिसऱ्या यादीतील पात्र शेतकरी अद्याप देखील या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे. त्याचबरोबर प्रोत्साहन अनुदानासाठी केवायसी करणे बंधनकारक होते. याच कारणामुळे शेतकरी (Agriculture Information) या अनुदानाच्या प्रतीक्षेत राहिले. याचं शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून आज दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे.

700 कोटींच्या निधी मंजुरी
केवायसी केलेल्या पात्र शेतकऱ्यांसाठी तिसऱ्या हप्त्यापोटी राज्य शासनामार्फत एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेऊन तब्बल 700 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाची ही रक्कम मार्च महिन्यापर्यंत खात्यात जमा होऊ शकते. अनेक दिवसांपासून केवायसी करून तसेच कागदपत्रांची पूर्तता करुन देखील जे शेतकरी या अनुदानाच्या प्रतीक्षेत होते, त्या शेतकऱ्यांना आता राज्य शासनाच्या या निर्णयामुळे मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

लिंकिंग प्रक्रिया बंधनकारक
ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड आपल्या बँक खात्याला लिंक केले नाही त्यांना हे अनुदान मिळण्यासाठी अडचण निर्माण होणार असल्याचे राज्य शासनामार्फत सांगण्यात आले होते. या अनुदानासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आधार कार्ड बँक खात्याला लिंक करावे लागेल. जर तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असेल तरच तुमचे नाव या लाभार्थी यादीमध्ये येईल. अन्यथा तुमचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर लिंकिंग प्रक्रिया करून घ्यावी. तरच शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळू शकणार आहे, अशी माहिती देण्यात आली होती.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: For the third phase of the incentive subsidy, approval for the distribution of funds of crores, know when it will be in the account

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button