ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Land Approval| या जिल्हा मध्ये 10 गुंठ्यापेक्षा कमी जमिनीची खरेदी-विक्रीला मंजूरी!

In this district less than 10 Guntas land purchase and sale approval

Land Approval | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता नाशिक जिल्ह्यात 10 आरपेक्षा कमी जमिनीची खरेदी-विक्री शक्य झाली आहे. विहीर, शेतरस्ता, घरकुल योजनेसाठी तुकडा खरेदी-विक्री यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने मंजूरी देण्यात आली आहे.

यापूर्वी, बागायतीसाठी २० गुंठे आणि जिरायतीसाठी ८० गुंठे क्षेत्रापेक्षा कमी जमिनीची(LandApproval)खरेदी-विक्री बंदी होती. यामुळे अनेक शेतकरी रस्ता, विहीर, निवासासाठी जमिनीची खरेदी-विक्री करताना अडचणीत येत होते. तसेच, २० आर. क्षेत्राची दोन भावांमध्ये समान वाटप करतानाही अडचणी निर्माण होत होत्या.

या अडचणी दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जमीन तुकडाबंदी कायद्यात सुधारणा करून शिथिलता दिली आहे. आता नाशिक जिल्ह्यात जिरायतीसाठी २० गुंठे आणि बागायतीसाठी १० गुंठे पर्यंत जमिनीची खरेदी-विक्री करता येईल.

वाचा|मच्छिमार आणि मत्स्यपालकांसाठी आनंदाची बातमी! घरबसल्या मिळणार कर्ज!

महत्त्वाचे मुद्दे:

  • नवीन नियमानुसार विहिरीसाठी जास्तीत जास्त ५ आर.पर्यंत जमीन खरेदी-विक्री होईल.
  • शेतकऱ्यांकडून शेतरस्ता खरेदी-विक्री करता येईल.
  • खरेदी करताना संबंधित शेतकऱ्यांसाठी त्याचा वापर देय असेल, असा शेरा इतर अधिकारात नमूद केला जाईल.
  • सार्वजनिक प्रयोजनासाठी शासनाकडून भूसंपादन केल्यानंतर २० किंवा १० आरपेक्षा कमी जमिनीची खरेदी.
  • ग्रामीण घरकुल योजनेसाठी प्रत्येक लाभार्थ्याला कमाल एक हजार चौरस फुटांपर्यंत अशा जमिनीचे हस्तांतरण करता येणार.
  • तुकडे खरेदी-विक्रीस जिल्हाधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक.

या निर्णयामुळे नाशिकमधील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. रस्ता, विहीर, निवासासाठी जमिनीची खरेदी-विक्री करणे आता सोपे होईल. तसेच, २० आर. क्षेत्राची दोन भावांमध्ये समान वाटप करणेही आता शक्य झाले आहे.

Web Title |In this district less than 10 Guntas land purchase and sale approval!

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button