ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Education Loan | विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आता विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मिळणार ‘इतक्या’ लाखांचे कर्ज

अनेकदा विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यायची इच्छा असते पण पैशांअभावी त्यांना आपले शिक्षण थांबावावे लागते. कारण शिक्षण घ्यायचे म्हटलं की, पैसा हा मोठ्या प्रमाणात लागतो. याचमुळे बँकांकडून विद्यार्थ्यांना आर्थिक (Financial) मदत म्हणून शैक्षणिक कर्ज (Educational Loan) दिले जाते. आता विद्यार्थ्यांसाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (Bank) संचालक बोर्डाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी चांगलाच फायदा होणार आहे.

वाचा: धक्कादायक! प्रेमसंबंध आले जीवाशी, जळगावात दुहेरी हत्याकांडाने खळबळ, सख्ख्या भावानेच बहिणीचा केला

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्जत मोठी वाढ
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक बोर्डाने विद्यार्थ्यांना देण्यात येणारे शैक्षणिक कर्जामध्ये (Loan) मोठी वाढ केली आहे. आता या निर्णयानंतर देशांतर्गत विद्यार्थ्यांना तब्बल 30 लाखांचे शैक्षणिक कर्ज मिळणार आहे. हा निर्णय होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना 15 लाखांचे शैक्षणिक कर्ज मिळत होते. त्याचबरोबर विद्यार्थी परदेशात शिकण्यास असेल तर त्याला तब्बल 40 लाखांचे कर्ज शैक्षणिक कर्ज मिळणार आहे. तरी यापूर्वी हे कर्ज 25 लाखांचे मिळत होते. ज्यात आता मोठी वाढ करण्यात आली आहे.

वाचा: यंदा सोयाबीनला मिळणार चांगला दर, जाणून घ्या काय आहे कारण..

विद्यार्थ्यांना दिलासा…
आता या शैक्षणिक कर्जत वाढ झाल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता विद्यार्थ्यांना पैशांअभावी शिक्षण थांबवावं लागणार नाही. विद्यार्थ्यांना आता शैक्षणिक कर्ज जास्त मिळत असल्यामुळे त्यांना उच्च शिक्षण घेता येणार आहे. तसेच परदेशात जाऊन देखील शिक्षण घेता येईल. त्याचमुळे विद्यार्थ्यांसाठी ही एक आनंदाची आणि अतिशय महत्वाची बातमी आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Important news for students! Now students will get loans of so many lakhs for education

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button