ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
पशुसंवर्धन

Summer Precautions | सावधान ! उन्हाळा वाढतोय ; जनावरांना होऊ शकते ‘या’ आजाराची लागण … अशी घ्या काळजी

Summer Precautions |उन्हाळ्यात वातावरण उष्ण असते. यामुळे माणसांना त्रास होतो. कित्येकांचे तर उष्माघाताने जीव सुद्धा जातात. माणसांनाच एवढा त्रास होतो म्हंटल्यावर जनावरांना तर याहून जास्त त्रास होत असणार ! उन्हाळ्यामध्ये बहुतांश जनावरांना ‘लू’ या आजाराची लागण होते. यामुळे जनावरे दगावण्याची देखील शक्यता असते.

जनावरांची काळजी घेणे आवश्यक

दरम्यान या आजाराच्या पार्श्वभूमीवर सध्या जनावरांची काळजी घेणे आवश्यक आहे. वातावरणात तापमान वाढल्याने पशुसंवर्धन विभागाने ( Animal Husbantry Department) सुद्धा लू आजाराची शक्यता लक्षात घेत, जनावरांसाठी उपचार पद्धती जाहीर केली आहे. यामुळे पशुपालकांना व शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे.

जनावरांना हिरवा चारा द्या

उन्हाळ्याच्या दिवसात जास्त तापमान असते त्यामुळे जनावरांना हिरवा चारा खायला द्यावा. उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याची कमतरता असते म्हणून शेतकऱ्यांनी आधीच मूग, मका कडवल शेतात लावावे. यामुळे भर उन्हाळ्यात गुरांना हिरवागार चारा ( Green Food) मिळतो. तसेच या काळात गुरांना पाण्यामध्ये मीठ आणि पीठ टाकून खाऊ घालावे.

उन्हाळयात गुरांची भूक कमी होते

उष्णता वाढली की गुरांच्या पचनशक्तीवर परिणाम होतो आणि त्यांची भूक कमी होते. यामुळे अधिक कार्बोहायड्रेट असणारे पदार्थ गुरांना खाऊ घालावेत. अमिनो पॉवर व ग्रो बी-फ्लेक्स चाऱ्यात मिसळून घालणे सुद्धा फायदेशीर ठरते. तसेच गुरांचा खुराक वाढवण्यासाठी ग्रोलिव फोर्ट द्यायला हवे.

दिवसातून २ ते ३ वेळा पाणी द्यावे

गुरांच्या राहण्याची जागा म्हणजेच गुरांचा गोठा मोकळ्या जागेत असावा. यामध्ये पंखा, कुलर किंवा फवारा सिस्टीम लावावी. गुरांना उन्हामध्ये न बांधता गोठ्यात बांधावे. तसेच दिवसातून १ ते २ वेळा गुरांना गार पाण्याने अंघोळ ( Bath with cold water) घालावी. महत्त्वाची बाब म्हणजे गुरांना दिवसातून तीन ते चार वेळा पाणी द्यावे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: How to take care of animals in summer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button