ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
इतर

Home Loan | तुम्हीही फ्लॅट किंवा घर घेण्याचा विचार करताय? तर जाणून घ्या किती असावा पगार आणि हप्ता…

Home Loan | अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन गोष्टी सामान्य माणसाच्या आयुष्यात खूप महत्त्वाच्या आहेत. चांगलं काम केल्यावर भाकरी-कपड्याचा जुगाड सहज होतो. मात्र त्याला घरासाठी बराच वेळ थांबावे लागते. विशेषतः असे लोक ज्यांचा पगार खूपच कमी आहे. पण आजकाल गृहकर्जाच्या सुविधेने खूप सोपे केले आहे. तुम्हीही गृहकर्जावर घर (Home Loan) किंवा फ्लॅट घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ही बातमी एकदा पूर्ण वाचा.

आजकाल घर घ्यायचे की नाही यावर बरीच चर्चा होत आहे. भाड्याने राहण्याचा काही फायदा आहे का? खर तर, घर घेणे किंवा भाड्याने राहणे. या दोन्हीपैकी निर्णय तुमच्या उत्पन्नावर अवलंबून असतो. म्हणूनच घर घेण्याचा निर्णय घेण्यापूर्वी तुम्हाला तुमचे बजेट पाहणे आवश्यक आहे. आजकाल, मेट्रो शहरात घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, लोक गृहकर्ज घेतात आणि वर्षानुवर्षे ईएमआय भरतात. काही लोक आपली संपूर्ण बचत डाउन पेमेंटमध्ये गुंतवतात किंवा कुटुंबातील सदस्यांकडून कर्ज घेतात. अशा परिस्थितीत ईएमआयसोबतच कर्जाची रक्कमही त्यांच्या खांद्यावर पडते.

वाचा: अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

नवीन घर कधी खरेदी करायचे?

आर्थिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की घर खरेदी करताना गृहकर्जाचा EMI तुमच्या पगाराच्या जास्तीत जास्त 20 ते 25 टक्के असावा असे सामान्य सूत्र आहे. जर तुमचा पगार दरमहा 1 लाख असेल तर तुम्ही दरमहा 25 हजारांपर्यंत EMI सहज भरू शकता. दुसरीकडे, जर तुमचा पगार 50 ते 70 हजारांच्या दरम्यान असेल, तर 25 हजार किंवा त्याहून अधिक ईएमआय देणे तुमच्यासाठी महाग ठरू शकते.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

किती असावा हप्ता?

अशा परिस्थितीत भाड्याच्या घरात राहणे एक प्रकारे फायदेशीर ठरेल. जर पगाराच्या रकमेपैकी फक्त 25 टक्के रक्कम कर्जाची EMI झाली तर नक्कीच घर खरेदी करा. दुसरीकडे, जर पगार 50 ते 70 हजार रुपयांच्या दरम्यान असेल आणि घराचा EMI दर महिन्याला 20 हजार रुपयांपेक्षा कमी असेल, तर तुम्ही सहजपणे घर करू शकता.

तर मित्रांनो तुम्ही 25 लाख रुपयांपर्यंतचे घर खरेदी करू शकता. ज्याचे 20 वर्षांसाठी 20 हजार रुपये हप्ता येईल. पण जर घराची किंमत 30 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर 50 ते 70 हजार पगार असणाऱ्यांसाठी भाड्याने राहणे फायदेशीर ठरणार आहे. म्हणूनच दर महिन्याला बचत करण्यावर लक्ष केंद्रित करा. तसेच जेव्हा पगार सुमारे 1 लाख रुपयांपर्यंत पोहोचेल तेव्हा तुम्ही अधिक डाउन पेमेंट भरून घर खरेदी करू शकता.

पगारातून EMI शिल्लक

1 लाख पगारावर 30 ते 35 लाखांचे घर घेणे हा योग्य निर्णय आहे.
1 लाख 50 हजार पगारावर 50 लाखांचे घर घेणे हा योग्य निर्णय असेल.

Web Title: Are you also thinking of buying a flat or a house? So know how much should be the salary and allowance

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button