कृषी तंत्रज्ञान

Block Chain Technology in Agriculture|ऐकली का कधी तुम्ही ब्लॉकचैन तंत्रज्ञान? कृषी क्षेत्रातील या उपयुक्त तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती नक्कीच वाचा..

Why Block Chain Technology| ब्लॉकचैन टेक्नॉलॉजी का?

भारताच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्र हा सर्वात मोठा भागीदार आहे. कृषी क्षेत्रामध्ये शास्त्रज्ञ आज नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांसाठी उत्पन्न वाढविण्यास काम करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवस्था सुद्धा वाढण्यास मदत मिळते. कृषी यांत्रिकी करणामुळे ( Farm Mechanization)यामुळे शेतकऱ्याच्या भरपूर मदत होते व जास्त कष्ट लागत नाहीत.सुरुवातीच्या काळात मशागतीसाठी हाताने खोदणी, नंतर बैलचलित नांगरणी केली जाई. त्याला सध्या पॉवर टिलर किंवा ट्रॅक्टरचलित मशागतीचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. आज पिकाच्या वाढीसाठी नैसर्गिक खत सर्वात जास्त उत्पन्न देणारे बियाणे भाषा अनेक प्रयत्न चालू आहेत त्यामुळे उत्पन्नात भरघोस वाढ येईल व शेतकऱ्यांच्या कष्टाला चीज मिळेल. आज जर आपण शेतकऱ्यांना दुसरा पर्याय उदरनिर्वाह दिला गेला तर नक्कीच ते शेती सोडून दुसरीकडे जायला तयार आहेत कारण शेतीमध्ये भरपूर असे घटक असतात ज्यामुळे अडचणींच्या सामोरे जावे लागते.मात्र, शिक्षणाचा अभाव आणि ग्रामीण भागातील सामाजिक परिस्थिती यामुळे त्यांची गरिबीपासून सुटका होत नाही. अल्पभूधारक शेतकऱ्यांची या साऱ्या समस्यातून मुक्तता करण्यासाठी ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी हे चांगले उत्तर ठरू शकते.

वाचा- आता बहुस्तरीय भाजीपाला पद्धतीमुळे दुप्पट नाही तर चार पट होतो फायदा ..जाणून घ्या या शेती बद्दल सविस्तर माहिती..

What is Block Chain Technology| ब्लॉकचैन टेक्नॉलॉजी म्हणजे नक्की काय?

ब्लॉक चेन तंत्रज्ञान हे नोंदवहीप्रमाणे काम करते. त्याला इंग्रजीमध्ये डिस्ट्रिब्युटेड लिजर टेक्नॉलॉजी (DLT) असे म्हणतात. यामध्ये कार्यरत सर्व घटक एकमेंकाशी जोडलेले असून, त्यांचे व्यहवार पाहत येतात. यामुळे व्यवहार सोप्या पद्धतीने करता येतात .जेव्हा एखाद्या व्यवहाराची नोंद त्यामध्ये होते, त्यावर ब्लॉकचेनमध्ये शिक्कामोर्तब होते, त्या वेळी ती त्या नोंदवहीचा एक भाग होते. ना तो मिटला जातो नाही मी ठेवला जाऊ शकतो. त्यामध्ये कोणीही बदल करू शकत नाही.कृषिक्षेत्राच्या उत्थानासाठी ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी ही नवीन मिती देणारे आधुनिक तंत्रज्ञान आहे.या तंत्रज्ञानाद्वारे खरेदीदार आणि विक्रेते यांच्यासोबत शेतकऱ्यांना जोडणे शक्य होणार आहे. यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला एक डिजिटल ओळख तयार करण्याची संधी असून, त्याद्वारे त्याच्याकडे येणाऱ्या व खर्चल्या जाणाऱ्या आर्थिक बाबींचा सर्व इतिहास नोंदवला जाऊ शकतो. त्यातून त्याला आवश्यक तर कमी अधिक प्रमाणात कर्जाची उभारणी करणेही शक्य होऊ शकते.

Block Chain Technology in Agriculture |कृषिक्षेत्रात ब्लॉकचैन तंत्रज्ञानाचा चा वापर :

अन्नपुरवठा, अन्नसाखळी ,कृषी अनुदानाचे पारदर्शक वाटप, जमिनीचे अधिकार यासारख्या अनेक टप्प्यावर ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरणे शक्य आहे. ब्लॉकचेन अंतर्गत कोणतीही माहिती डिजिटल नोंदवहीमध्ये नोंदणी केली जाऊ शकते.मध्यस्थांची मुजोरी किंवा अडवणूक कमी होईल.जर भारत सरकार आपल्या वेगवेगळ्या संबंधित संस्था, घटकांसह या तंत्रज्ञानामध्ये संपूर्ण ताकदीने उतरल्यास कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी नवी अर्थव्यवस्था उभी राहील. या तंत्रज्ञानामुळे नक्कीच शेतकऱ्याची क्रांती होण्याची शक्य आहे.

ऋतुजा ल.निकम( MBA AGRI)

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button