ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Abdul Sattar | बिग ब्रेकिंग! 15 दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 503 कोटी, कृषीमंत्री अब्दुल सत्तार

Abdul Sattar | राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंद वार्ता समोर आली आहे. महाराष्ट्र बजेट 2023 मध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्याचवेळी राज्यातील शेतकऱ्यांना केवळ एक रुपयांत आपल्या पिकाचा पीक विमा (Abdul Sattar) काढता येईल अशी मोठी घोषणा केली. शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा पीक विमा सहज काढता येणार आहे. अशातच आता राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी पीक विम्याबाबत मोठी माहिती दिली आहे.

15 दिवसांतच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार रक्कम
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे की, पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करत आहेत. म्हणजेच शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई देत आहेत. तसेच शेतकऱ्यांची पीक विम्याची (Crop Insurance) उर्वरित रक्कम येत्या 15 दिवसांतच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. याबाबत अब्दुल सत्तार यांनी विधानसभेत माहिती दिली आहे.

किती आहे उर्वरित पीक विम्याची रक्कम?
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या पिकांसाठी भरपाई देण्यात येते. पण शेतकरी वेळोवेळी क्लेम करून देखील पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देण्यास हात आखडता घेतात. यामुळेच शेतकरी संघटना आक्रमक होऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतात. अशाचप्रकारे उर्वरित पीक विम्याची तब्बल 503 कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात 15 दिवसांत जमा करण्यात येणार आहे.

एका रुपयांत निघणार पिक विमा
शेतकऱ्यांना एका रुपयात पिक विमा निघणार आहे. ज्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यासाठी तब्बल 3 हजार 312 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याबाबत देखील अब्दुल सत्तार यांनी माहिती दिली आहे. पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात 15 दिवसांत जमा होणार असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Big Breaking! 503 crores will be credited to farmers’ accounts in 15 days, said Agriculture Minister Abdul Sattar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button