ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
पशुसंवर्धन

Goat Rearing | पशुपालकांनो पावसाळ्यात शेळ्यांचे ‘अशा’प्रकारे करा व्यवस्थापन, संसर्गापासून होईल बचाव…

शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी पशूपालन व्यवसाय करत असतो.

Goat Rearing | या पशुपालन व्यवसायामध्ये (Animal husbandry business) शेतकरी प्रामुख्याने गाई (Cow), म्हशी (Buffalo) आणि शेळी-मेंढीचे पालन (Goat and sheep rearing) करत असतात. यामध्ये शेळ्यांना गोर-गरिबांची गाय म्हणून संबोधले जाते. शेळीपालन हा व्यवसाय (Goat rearing business) सर्वसामान्यांना परवडणारा आणि कमी जागेत करता येणार व्यवसाय आहे. सध्या, पावसाळा ऋतू सुरू झालेला असून या ऋतूमध्ये शेळ्यांचे व्यवस्थापन कसे करावे याबद्दल आपण जाणून घेऊया.

पावसाळ्यात शेळ्यांची घ्यावी विशेष काळजी
पावसाळ्यात होणाऱ्या हवामानातील बदलांप्रमानेच शेळ्यांच्या संगोपनात बदल करणे गरजेचे आहे. कारण, पावसाळ्यात आद्रतेचे प्रमाण जास्त होऊन गोठ्यात होणारी आद्रता वाढून शेळीच्या शरीरावर त्याचा दुष्परिणाम होतो. तसेच, श्‍वसनसंबंधी रोग होण्याचीही दाट शक्यता निर्माण होते. त्यामुळे पावसाळ्यात शेळ्यांची योग्य प्रकारे काळजी घ्यावी.

वाचा: Para Grass | दुभत्या जनावरांच्या चाऱ्याची चिंताच मिटली! ‘हा’ हिरवा चारा ठरेल फायदेशीर, जाणून घ्या सविस्तर

शेळीपालन का ठरत फायद्याचं?
शेळ्यांना इतर जनावरांप्रमाणे जास्त जागा लागत नाही. तसेच, गाई म्हशींसारख्या जनावरांपेक्षा कमी प्रमाणात चारा त्यांना लागतो. त्यामुळे शेळ्यांच्या आरोग्याचे, चाऱ्याचे व पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन केल्यास हा व्यवसाय अतिशय फायदेशीर ठरतो.

वाचा: Bloating in Animals | पावसाळ्यात जनावरांची पोटफुगी टाळण्यासाठी ‘अशी’ घ्या काळजी!

पावसाळ्यात शेळीपालन करताना खालीलप्रमाणे काळजी घ्यावी
सर्वप्रथम, शेळ्यांचा कळप जंतुमुक्त राहण्यासाठी सर्व शेळ्यांना जंतुनाशक औषधे द्यावी. पावसाळ्यात गोचीड वाढीसाठी अनुकूल वातावरण तयार झाल्यामुळे जनावरांमध्ये गोचडाची संख्या वाढते. अशा परिस्थितीत शेळ्यांना गोचीड प्रतिबंधक औषध द्यावे किंवा त्यांच्या शरीराला गोचीड प्रतिबंधक पावडर लावावी. शेळ्यांच्या गोठा रोज झाडून घेऊन स्वच्छ ठेवावा. पावसाळ्यात शेळ्यांना बाहेर सोडू नये. कारण, पावसात शेळी भिजली की त्यांना न्यूमोनियासारखा आजार होतो. तसेच, रात्रीच्या वेळी आद्रता कमी करण्यासाठी गोठ्यात 60 वॉटचा विजेचा बल्ब लावल्यास हवेतील आद्रता कमी होऊन शेळी निरोगी राहू शकतात.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button