ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Earthquakes | मराठवाड्यात पुन्हा भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!

Earthquakes | Earthquake shocks again in Marathwada, atmosphere of fear among citizens!

Earthquakes | नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये आज सकाळी 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी भूकंपाचे धक्के(Earthquakes)बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हिंगोली जिल्ह्यात दोन वेळा भूकंप

हिंगोली जिल्ह्यात आज सकाळी 3.6 आणि 4.5 रिश्टर स्केल तीव्रतेचे दोन भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे होता. हिंगोली, परभणी आणि नांदेड या तिन्ही जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.

घरांना भेगा, नागरिकांमध्ये भीती

भूकंपामुळे काही घरांच्या भिंतींना भेगा गेल्या आहेत. दांडेगाव येथील अनेक सिमेंटच्या घरांना तडे गेल्याची माहिती आहे. या घटनेने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वाचा | Agriculture News | आनंदाची बातमी! शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल 3.22 कोटींची रक्कम जमा, जाणून घ्या सविस्तर

मागील महिन्यातही भूकंप

यापूर्वी मार्चच्या पहिल्या आठवड्यात मराठवाड्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते.

प्रशासनाकडून आवाहन

नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

  • भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर मोजली जाते.
  • रिश्टर स्केलवर 1 ते 3.9 पर्यंत तीव्रतेचे भूकंप सामान्यतः जाणवत नाहीत.
  • 4 ते 4.9 पर्यंत तीव्रतेचे भूकंप हलके असतात.
  • 5 ते 5.9 पर्यंत तीव्रतेचे भूकंप मध्यम असतात.
  • 6 ते 6.9 पर्यंत तीव्रतेचे भूकंप तीव्र असतात.
  • 7 आणि त्यापेक्षा जास्त तीव्रतेचे भूकंप विनाशकारी असतात.

Web Title | Earthquakes | Earthquake shocks again in Marathwada, atmosphere of fear among citizens!

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button