ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
शासन निर्णय

‘या’ जुन्या पीक विमा योजनेची कागदपत्रे थेट शेतकऱ्यांच्या घरपोच होणार.. गहाळ कागदपत्रांसाठी ‘मेरी पॉलिसी मेरे हाथ’ ही सरकारची नवी शक्कल !

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांचा विकास व्हावा यासाठी सरकार कायम प्रयत्नशील असते. यासाठी केंद्र सरकार कडून विविध योजनाही राबविल्या जातात. आता देखील मोदी सरकारने ‘मेरी पॉलिसी मेरे हाथ’ ही नवी योजना सुरू केली आहे.

यासाठी सुरू केली योजना

सरकारने २०१६ मध्ये पीक विमा योजना ( PM Fasal Vima Yojna) सुरू केली होती. परंतु या योजनेची हार्ड कॉपी (Hard copy) शेतकऱ्यांना दिली जात न्हवती. याच कारणामुळे पिकांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यानंतरही शेतकऱ्यांना विमा दावा (claim) करता येत आला नाही. शेतकऱ्यांची हीच कागदपत्रांची अडचण दूर व्हावी यासाठी सरकारने ही योजना आणली आहे.

अशी असणार योजना

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ही योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे आता विमा पॉलिसीची कागदपत्रे शेतकऱ्यांना घरपोच मिळणार आहेत. कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत देशातील 36 कोटींहून अधिक शेतकऱ्यांनी पंतप्रधान (Prime Minister) पीक विमा योजनेचा लाभ घेतला आहे. या नवीन योजनेमुळे शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत होणार असून दलाल आणि मध्यस्थांचा प्रभावदेखील कमी होईल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button