ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

प्रचंड नफा मिळवून देणाऱ्या या शेतीबद्दल तुम्हाला माहित आहे का? केंद्रसरकारकडूनही मिळते आर्थिक मदत…

खेडोपाडी शेताच्या बांधावर किंवा कोपऱ्यात बांबूची बेटे तुम्ही पाहिलीच असतील. या बांबूला बाजारपेठेत मोठी किंमत मिळत असून याचा उपयोग बऱ्याच ठिकाणी केला जातो. आता केंद्र सरकारने याच बांबूच्या शेतीसाठी खास ‘राष्ट्रीय बांबू मिशन’ ही योजना आणली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी अनुदान दिले जाते.

वाचा –

अशी आहे राष्ट्रीय बांबू मिशन योजना

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, त्यांना अधिक नफा मिळावा यासाठी केंद्र सरकार( Central Goverment) कायम प्रयत्नशील असते. सध्या भारतात बांबू लागवडीचे क्षेत्र कमी झाल्याने केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय बांबू मिशन’ ही योजना आणली आहे. या योजने अंतर्गत खालील गोष्टी केल्या जाणार आहे.

वाचा –

१) बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जाते.
२) बांबू लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रति रोप १२० रुपये दराने आर्थिक मदत
३) बांबू लागवडीचे क्षेत्र (Area) वाढविणे
४) बांबू शेती संदर्भात मार्गदर्शन (Guidence)
५) बांबू उपयोगी असणाऱ्या उद्योगांना चालना देणे

म्हणून बांबूची शेती करणे आवश्यक

बांबू हे बऱ्याच उद्योगांमध्ये वापरला जाणारा प्राथमिक आणि महत्त्वाचा घटक आहे. बांधकाम, फर्निचर, लगदा, कागद, सजावटीच्या वस्तू इत्यादी गोष्टींमध्ये बांबू वापरला जातो. ग्रामीण भागात कैकाडी जमातीचे लोक बांबूपासून विविध उपयोगी(Useful) वस्तू बनवण्याचा लघु उद्योग करतात.यामध्ये शेतमालासाठी लागणाऱ्या लाकडी पाट्या ,टोपल्या,डालगी यांचा समावेश होतो. बांबू आतून पोकळ असला तरी टणक असल्याने त्याचा बहुतेक कामांसाठी उपयोग होतो. आता केंद्रसरकार (central Goverment) देखील या संबंधीत उद्योगांना चालना देण्यासाठी प्रयत्नशील झाले आहे.

हे ही वाचा –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button