ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

‘हा’ आहे संक्रांतीच्या पूजेचा योग्य मुहूर्त; भारतात इथे साजरी केली जाते मकर संक्रांत..

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. या देशात अनेक सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतात. मकर संक्रात हा यातीलच एक सण. हिंदू धर्मात मकर संक्रात या सणाला विशेष महत्त्व आहे. या सणादिवशी पवित्र नदीत (Holy River) स्नान करून सुर्यदेवाचे पूजन करणे आणि त्याला अर्ध्य वाहणे याला विशेष महत्त्व आहे.

वाचा –

या वेळेत केली जाते संक्रांत

हिंदू पंचांगानुसार दरवर्षी १४ किंवा १५ जानेवारी रोजी मकरसंक्रांत हा सण साजरा केला जातो. यंदा शुक्रवार १४ जानेवारी २०२२ रोजी मकरसंक्रांत हा पवित्र सण आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार १४ जानेवारी २०२२ रोजी दुपारी २ वाजून २७ मिनिटांनी सूर्य देव मकर राशीत गोचर होतील. हा दिवस पुण्यसंचयाचा आहे.

वाचा –

संक्रांतीच्या पूजेसाठी योग्य मुहूर्त (Perfect Time)

शुक्रवार १४ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ७ वाजून १५ मिनिटांपासून संध्याकाळी ५ वाजून ४४ मिनिटांपर्यंत पुण्यकाळ आहे. महापुण्याचा काळ सकाळी ९ ते सकाळी १०.३० पर्यंत आहे. या कालावधीत सूर्यदेवाचे नामस्मरण करणे, सूर्यमंत्राचा जप करणे, गायत्री मंत्राचे पठण करणे, गरजूंना दानधर्म करणे याला विशेष महत्त्व (Importance) आहे.

भारतात या ठिकाणी केली जाते संक्रात

भारतात वेगवेगवेगळ्या राज्यात संक्रांत या सणाला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. तामिळनाडूमध्ये पोंगल उत्तर भारतात खिचडी, गुजरातमध्ये उत्तरायण या नावाने मकर संक्रांत साजरी केली जाते.मकर संक्रांतीच्या दिवशी मृत्यू झाल्यास मोक्ष मिळतो अशा आख्यायिका पुराणात प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रात तिळगुळ वाटून संक्रांत साजरी केली जाते. यादिवशी स्त्रिया वाण देखील लुटतात.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button