ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Crop loan | आनंदाची बातमी! या जिल्हा बँकेचा शेतकऱ्यांना दिलासा, ३ लाखापर्यंत पीक कर्ज व्याज माफ!

Crop loan Good news! Relief to the farmers of this district bank, crop loan interest waived up to 3 lakh!

Crop loan | राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जळगाव जिल्हा बँकेने ३ लाख रुपये पर्यंत पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे (Crop loan) व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील १ लाख ९० हजार शेतकऱ्यांना ७२ कोटी रुपयांचा दिलासा मिळणार आहे.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत या निर्णयाची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारने ३ लाख रुपये पर्यंत पीक कर्जाचे व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, नंतरच्या काळात पुन्हा एक आदेश काढून व्याजासहित कर्ज वसूल करण्याचे सांगितले. यामुळे शेतकऱ्यांवर मोठा बोजा पडणार होता.

या निर्णयामुळे ज्या शेतकऱ्यांनी मागील आर्थिक वर्षात ३ लाख रुपये पर्यंत पीक कर्ज घेतले आणि ३१ मार्च २०२४ पर्यंत ते कर्ज पूर्णपणे फेडले आहे, अशा शेतकऱ्यांना व्याजाचा लाभ मिळणार आहे. (Crop loan) थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी मात्र हा निर्णय लागू होणार नाही.

वाचा |

श्री. पवार यांनी या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल आणि त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास मदत होईल, असेही सांगितले.

या निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title | Crop loan Good news! Relief to the farmers of this district bank, crop loan interest waived up to 3 lakh!

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button