ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
आर्थिक

Allocation of Loans | भारीच की ! धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील 1 लाख लाभार्थ्यांना सवलत कर्जाचे वाटप …

Allocation of Loans | That's heavy! Distribution of concessional loans to 1 lakh beneficiaries in Dhule, Nandurbar and Jalgaon districts...

Allocation of Loans | 13 मार्च 2024 रोजी, देशातील 1 लाख लाभार्थ्यांना सवलत कर्जाचे वाटप प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील लाभार्थ्यांनाही या कार्यक्रमाचा लाभ मिळणार आहे.

हा कार्यक्रम राजर्षी शाहू महाराज नाट्यमंदीर, पारोळा रोड, धुळे येथे दुपारी 4 वाजता आयोजित करण्यात आला आहे. (Allocation of Loans) यात केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या अधिपत्याखालील तीन राष्ट्रीय महामंडळामार्फत कर्ज वाटप केले जाईल.

  • राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ
  • राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळ
  • राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त आणि विकास महामंडळ

वाचा | Interest Free loan Scheme | सरकारच्या बिनव्याजी कर्ज योजनेचा लाभ; जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना तब्बल 60 कोटी व्याज सवलत…

या कार्यक्रमामध्ये प्रधानमंत्री काही लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.

जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी सर्व नोडल अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. कार्यक्रमासाठी योग्य आकाराचे एलईडी स्क्रीन, बैठक व्यवस्था, ध्वनी आणि विद्युत व्यवस्था यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

या कार्यक्रमासाठी येणाऱ्या लोकप्रतिनिधी, नागरिक, शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि लाभार्थी यांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाकडून कार्यक्रमस्थळी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.

बँकांनी मंजूर केलेल्या कर्ज प्रकरणातील लाभार्थ्यांना कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

या कार्यक्रमातून धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील अनेक लाभार्थ्यांना स्वयंरोजगार आणि व्यवसाय उभारणीसाठी मदत मिळणार आहे.

Web Title | Allocation of Loans | That’s heavy! Distribution of concessional loans to 1 lakh beneficiaries in Dhule, Nandurbar and Jalgaon districts…

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button