lang="en-US"> ‘या' जिल्ह्याच्या कापूस बोंडअळी अनुदानासाठी 11.70 कोटींचा निधी - मी E-शेतकरी

Subsidy | ‘या’ जिल्ह्याच्या कापूस बोंडअळी अनुदानासाठी 11.70 कोटींचा निधी वितरित, वाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय

शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नेहमीच विविध प्रकारची मदत केली जाते.

Subsidy | मग ते नैसर्गिक आपत्तीमुळे (Natural disaster) झालेल्या पीकाचे नुकसान (Crop loss) असो वा विविध योजनांच्या माध्यमातून दिले जाणारे अनुदान. त्याचवेळी आता कापूस बोंडअळीमुळे (Cotton Bondali) नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना (Damaged farmers) मदतीचा हात मिळणार आहे. यासाठी आता 11.70 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याबाबत शासन निर्णय (Government decisions) घेऊन मंजुरी देण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यातील शेतकरी अनुदानापासून वंचित
2017 मध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांत कापूसाचे बोंडअळीमुळे नुकसान झाले होते. यासाठी अमरावती, अकोला, उस्मानाबाद, बीड याचप्रमाणे औरंगाबाद अशा विविध जिल्ह्यांमध्ये शासनाच्या माध्यमातून हे बोंडअळी अनुदान वितरित करण्यात आले होते. परंतु यामध्ये जळगाव जिल्ह्यातील शेतकरी वंचित राहिले होते. आता याचसंदर्भात एक महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे. चला तर मग याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

वाचा: Weather | ब्रेकिंग न्यूज: अखेर मुहूर्त लागलाच! येत्या दोन दिवसांत ‘या’ जिल्ह्यांत जोरदार बरसणार मेघराजा

केवळ ‘इतका’चं निधी वितरीत
जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 33% पेक्षा कमी नुकसान झाले असल्याचे सांगून शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आलेले. त्याचवेळी आता 3 लाख 48 हजार 461 निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी आता तीन हप्त्यांमध्ये वितरित करण्यास मंजुरी दिलीय. तर या निधीतून जळगाव जिल्ह्यात केवळ 43 हजार 996 इतकाच निधी शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेला.

वाचा: शपत विधी कार्यक्रम : अखेर ठरंल तारीख आणि वेळ..

शेतकऱ्यांकडून याचिका दाखल आणि न्यायालयाचा निर्णय
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल पारोळा भागातील शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केलेली. याच याचिकेचा निकाल काही दिवसांपूर्वी म्हणजेच 8 जून 2022 रोजी लागला. त्याचवेळी यात राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना 11 कोटी 70 लाख 14 हजार रुपये एवढे अनुदान द्यावे अशा प्रकारचे आदेश देण्यात आलेत. या अनुदानासाठी पात्र लाभार्थ्यांची यादी सादर करण्यात यावी अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Exit mobile version