ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
इतर

Cm Kisan Samman Nidhi | ब्रेकींग! नमो शेतकरी योजनेची जबाबदारी थेट कृषी खात्यावर; जाणून घ्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळणार का लाभ?

Cm Kisan Samman Nidhi | शेतकऱ्यांसाठी सरकार नेहमीच विविध योजना राबवत आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या पीएम किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर आता राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना (Cm Kisan Samman Nidhi) नव्याने सुरू करण्यात आली आहे. पीएम किसान सन्मान योजने (Cm Kisan Samman Nidhi) प्रमाणेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 6 हजार रुपये शेतकऱ्यांना वितरीत केले जाणार आहेत. आता नमो शेतकरी योजनेची जबाबदारी कृषी विभागाकडे देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा लवकरात लवकर लाभ मिळणारं का? हे जाणून घेऊयात.

वाचा:  अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

नमो शेतकरी योजनेची जबाबदारी थेट कृषी खात्यावर
तर मित्रांनो शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 6 हजार रुपये वर्षाकाठी पीएम किसान योजनेच्या माध्यमातून दिले जात आहेत. तर ही योजना महसूल विभाग का कृषी विभाग कोणाच्या माध्यमातून राबवली जाईल याबाबत दोन्ही विभाग नेहमीच आमने सामने आले आहेत. परंतु आता राज्य सरकारच्या माध्यमातून राबवली जाणारी नमो शेतकरी महासन्मान योजनेची जबाबदारी थेट कृषी खात्याकडे देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळणार का लाभ?


आता पीएम किसान सन्मान निधी योजनेची जबाबदारी महसूल विभागाकडे आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेची जबाबदारी कृषी विभागाकडे देण्यात आल्याने दोन्ही योजना स्वतंत्र विभागाकडून राबवल्या जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. ज्याचं कारण म्हणजे दोन विभाग असल्याने शेतकऱ्यांना या योजनांचा फायदा लवकरात लवकर मिळू शकतो.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता कसा मिळणार?

  • पहिला हप्ता एप्रिल ते जुलै 2000
  • दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर 2000
  • तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च 2000

Web Title: Breaking! The responsibility of Namo Shetkari Yojana is directly on the Department of Agriculture; Know why the farmers will get the benefits as soon as possible?

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button