ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

Agricultural Advice | बळीराजावर ‘या’ तारखेला ओढवू शकत अवकाळी पावसाच संकट, नुकसानीपूर्वीच जाणून घ्या पीक निहाय कृषी सल्ला

Agricultural Advice | भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार,पुढील पाच दिवस दिनांक 11 ते 15 मार्च 2023 दरम्यान आकाश आंशिक ते अंशतः ढगाळ राहण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच 15 मार्च 2023 रोजी तुरळक (Agricultural Advice) ठिकाणी अति हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पाऊस होण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे काढलेल्या आलेल्या पिकांना याचा फटका बसू शकतो. म्हणूनच शेतकऱ्यांनी पीक निहाय हवामान आधारित कृषी सल्ला (Agricultural Advice) जाणून घेऊन त्यानुसार आपल्या पिकाची काळजी घ्यावी.

वाचाग्राहकांसाठी दिलासादायक, आता इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीसाठी बँकांकडून कमी व्याजदरात मिळणार कर्ज..

Agricultural Advice | कृषी सल्ला

  • पावसाचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील हरभरा, गहू, मोहरी, जवस आणि इतर रब्बी हंगामातील (Maharashtra Budget 2023)
    परिपक्व अवस्थेतील पिकाची कापणी आणि मळणीची कामे 13 मार्च 2023 पर्यंत करण्याला प्राधान्य द्यावे.
  • मळनीची
    कामे शक्य नसल्यास कापणी केलेला शेतमाल शेतामध्ये उघड्यावर न ठेवता एका ठिकाणी जमा करून प्लास्टिक
    शीट किंवा ताडपत्रीच्या सहाय्याने झाकून ठेवावा.
  • काढणी व मळणी केलेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी
    साठवणूक करावी.
  • पावसाचा अंदाज लक्षात घेता खते देण्याची कामे, आंतरमशागतीची कामे तसेच कीड व रोग
    व्यवस्थापनासाठी कृषी रसायनांच्या फवारणीची कामे पुढील 3 दिवसामध्ये करावी.
  • बाजारायोग्य फळे व
    भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी.

गहू
पावसाचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील गहू पिकाची काढणी आणि मळणीची कामे सुरु
ठेवावीत. तसेच काढणी व मळणी केलेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळनीची कामे
शक्य नसल्यास कापणी केलेला शेतमाल शेतामध्ये उघड्यावर न ठेवता एका ठिकाणी जमा करून
प्लास्टिक शीट किंवा ताडपत्रीच्या सहाय्याने झाकून ठेवावे.

वाचा – . दिलासादायक, e-NAM वर शेतकऱ्यांच्या पिकांना मिळणार योग्य दर; नोंदणी कशी करावी? पहा सविस्तर…

मूग
ओलिताची सुविधा उपलब्ध असल्यास उन्हाळी मुगाची पेरणी 15 मार्च पूर्वी करावी. यासाठी पुसा वैशाखी
या जातीचे हेक्टरी 12 बियाणे वापरावे व दोन ओळीतील अंतर 30 सेंमी ठेवावे. पेरणीपूर्वी बियाण्यास
शिफारशीतील बीज प्रक्रिया करावी.

हरभरा
पावसाचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील हरभरा पिकाची काढणी आणि मळणी ची कामे सुरु
ठेवावीत तसेच काढणी व मळणी केलेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळनीची कामे शक्य नसल्यास कापणी केलेला शेतमाल शेतामध्ये उघड्यावर न
ठेवता एका ठिकाणी जमा करून प्लास्टिक शीट किंवा ताडपत्रीच्या सहाय्याने झाकून ठेवावा.

हे ही वाचा –

Web Title: Unseasonal rains can bring disaster on Baliraja on date, know before damage crop wise agricultural advice

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button